Koyna Dam : मोठी बातमी! कोयना धरणातून 2 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग; आसपासच्या गावांना सतर्कतेचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Koyna Dam : जूनमध्ये पावसाने दडी मारल्यानंतर जुलैमध्ये तुफान पाऊस बरसला आहे. यानंतर नदी नाल्यांना पूर येऊन अनेक ठिकाणी जनजीवन देखील विस्कळीत झाले आहे. त्याचबरोबर धरण क्षेत्रातील पाणी पातळी देखील झपाट्याने वाढल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणजेच कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सोमवारच्या तुलनेमध्ये पावसाचे प्रमाण कमी आहे. सोमवारी पडलेल्या पावसामुळे धरणामधील पाणीसाठ्यात दोन टीएमसी ने वाढ झाली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता एकूण पाणीसाठा ६४.८१ टीएमसी झाला आहे.

मागच्या 24 तासांमध्ये कोयनानगर येथे ७४ (२८४९) मिलिमीटर, नवजाला ११५ (४०८८) मिलिमीटर आणि महाबळेश्‍वरला (Mahabaleshwar) ९६ (३७८८) मिलिमीटर पावसाची नोंद झाली असल्याची माहिती मिळत आहे. माहितीनुसार, कोयना धरणामध्ये पाणलोट क्षेत्रात पावसाचा वेग कमी झाला यामुळे धरण व्यवस्थापनाकडून पायथा वीजगृहातून कोयना नदीतील पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. (Koyna Dam)

दरम्यान सकाळी नऊ वाजता पायथा वीजगृहातील दुसरे जनित्र चालवून दोन हजार १०० क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदी पात्रात करण्यात सुरुवात केली आहे. त्यामुळे या नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे.

तुम्हाला जर रोजचा हवामान अंदाज पाहायचा असेल तर आत्ताच प्ले स्टोअर वर जा आणि आपले Hello Krushi हे ॲप इंस्टॉल करा हे ॲप इंस्टॉल केल्यानंतर ते मोबाईल मध्ये ओपन करा. आणि त्या ठिकाणी तुम्हाला ओपन केल्यानंतर हवामान अंदाज असा ऑप्शन दिसेल त्या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या गावात कधी पाऊस पडणार? किंवा हवामान अंदाज नेमका काय? आहे याबद्दल सविस्तर माहिती घेऊ त्यामुळे लगेचच हे ॲप इंस्टॉल करा. हवामान अंदाज याबरोबरच तुम्ही सरकारी योजना, पशूंची खरेदी विक्री, जमीन मोजणी, शेतमालाचे रोजचे ताजे बाजारभाव इत्यादी गोष्टींची देखील माहिती मिळू शकतात तीही अगदी मोफत.

error: Content is protected !!