Koyna Dam : दिलासादायक! कोयना धरण क्षेत्रात पुन्हा वाढला पावसाचा जोर; आता धरणात ‘इतका’ पाणीसाठा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Koyna Dam : शनिवारपासून कोयना धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरु आहे. निम्मा जुलै महिना उलटला तरी या भागात पावसाने दांडी मारली होती. पाऊस नसल्याने धरणाची पाणी पातळी कमी झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट आले होते. परंतु मागील दोन दिवसांपासून पावसाने धरण क्षेत्रात चांगलीच हजेरी लावली आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

यामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या धरणात जर मोठ्या प्रमाणात पाणी साठा उपलब्ध झाला तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत असतो. म्हणून शेतकऱ्यांच्या दृष्टीने या धरणात जास्त पाणी असणे खूप महत्वाचे आहे.

मागील काही दिवसांपासून कोयनानगर परिसरात पावसाची गती कमी झाली होती. परंतु दोन दिवसांपासून पडत असणाऱ्या सततच्या पावसामुळे एक हजार मिलिमीटरचा टप्पा पार केला असून नवजाला आतापर्यंत एक हजार ४८९ मिलिमीटर तर महाबळेश्‍वरमध्ये एक हजार ४८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. (Koyna Dam)

दरम्यान, कोयना जलाशयात प्रति सेकंद सात हजार १२९ क्युसेक पाण्याची आवक होत असून या जलाशयाची पाणीपातळी २०६६.०८ फूट इतकी आहे. त्यात आता एकूण पाणीसाठा २५.०८ टीएमसी झाला असल्याने शेतकऱ्यांची काळजी काही प्रमाणात मिटली आहे.

error: Content is protected !!