Koyna Dam : जुलै महिन्यामध्ये तुफान पाऊस झाल्यामुळे अनेक भागात नदी नाले दुधडी भरून वाहून गेले. त्याचबरोबर धरण क्षेत्रांमध्ये देखील पाणीसाठ्यात वाढ झाली. मात्र असे असले तरी अजूनही काही भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान कोयना धरण पाणलोट क्षेत्रात तालुक्यात पावसाने उघडीप दिली असल्यामुळे कोयना धरणाचा एकूण पाणीसाठा ८२.३१ टीएमसी झाला आहे. माहितीनुसार या जलाशयामध्ये प्रतिसेकंद 898 क्युसेक पाण्याची आवक होत आहे.
सध्या बऱ्याच ठिकाणी पावसाने उघडीप दिली आहे. मात्र गेल्या 24 तासांमध्ये कोयनानगर या ठिकाणी आठ, नवजाला २३ आणि महाबळेश्वरला (Mahabaleshwar) ४२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असल्याची माहिती समोर आली आह. त्याचबरोबर पायथा वीजगृहातून दोन हजार १०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. (Koyna Dam)
जमीन मोजणी, बाजारभाव, सातबारा उतारा, सरकारी योजना अशा बाबी मोबाईलवरून करण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा
मागच्या जुलैमध्ये सगळीकडे धो धो पाऊस पाहायला मिळाला. खरीप पेरण्या झाल्यापासून सातत्याने पाऊस पडत होता. त्यामुळे खरिपाच्या पिकांची आंतरमशागत देखील झाली नव्हती. सतत पाऊस पडत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानकारक स्थिती नव्हती मात्र रविवारपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे आता खरीप पिकांना योग्य वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आता पिके चांगली येतील असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
अजूनही काही भागातील शेतकरी चिंतेत
काही ठिकाणी पाऊस झाला असला तरी अजूनही काही ठिकाणी पाण्याचा प्रश्न हा मोठा निर्माण झाला आहे. बऱ्याच ठिकाणी जुलैमध्ये झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी केली होती मात्र त्या ठिकाणी म्हणावासा पाऊस झाला नव्हता त्यामुळे आता उगवून आलेल्या बियाणांना नेमकं पाणी कसं द्यायचं? असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे. त्यामुळे या ठिकाणची शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये नदी नाले अजूनही कोरडेच आहेत.
या ठिकाणी पहा रोजचा हवामान अंदाज
शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर रोजचा हवामान अंदाज जाणून घ्यायचा असेल तर लगेचच प्ले स्टोअर ला जाऊन आपले Hello Krushi हे ॲप इंस्टाल करा. हे ॲप इंस्टाल केल्यानंतर त्यामध्ये हवामान अंदाज हा ऑप्शन सिलेक्ट करून तुम्ही या ठिकाणी हवामान अंदाज चेक करू शकता. यामध्ये तुम्ही तुमच्या गावात कधी पाऊस पडणार याबाबत देखील माहिती घेऊ शकता तेही अगदी मोफत. त्यामुळे लगेचच प्ले स्टोअर वर जाऊन आपले Hello Krushi हे ॲप इंस्टाल करा.