Krushi Udaan Scheme : शेतमालास ‘उडान’चा बूस्ट; राज्यातील ‘या’ विमानतळांचा योजनेत समावेश!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांच्या शेतमालाला देश-विदेशातील बाजारपेठ उपलब्ध व्हावी. यासाठी केंद्र सरकारने सकारात्मक (Krushi Udaan Scheme) पाऊल उचलले आहे. नाशिक व पुणे विमानतळासह देशातील एकूण 58 विमानतळांचा केंद्रीय ‘कृषी उडान योजना 2.0’ अंतर्गत (Krushi Udaan Scheme) समावेश केला गेला आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक लाभासह त्यांच्या शेतमालाला जगभरात ओळख मिळणार आहे.

महाराष्ट्रातील नाशिक, पुणे विमानतळांचा या योजनेत (Krushi Udaan Scheme) समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना त्यांची कृषी उत्पादने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठांपर्यंत कमी वेळात, कमी खर्चात पोहोचवता येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे. शेतकऱ्यांना त्यांचा कृषी माल दूरच्या बाजारपेठांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करणे आणि त्यांचे उत्पन्नात वाढ होईल, या उद्देशाने ऑगस्ट 2020 मध्ये कृषी उडान योजना सुरु करण्यात आली होती.

काय आहे कृषी उडान योजना? (Krushi Udaan Scheme For Agriculture Products)

कृषी उडान योजना 2.0 ची घोषणा 27 ऑक्टोबर 2021 रोजी करण्यात आली. यात प्रामुख्याने: डोंगराळ प्रदेश, ईशान्य राज्ये आणि आदिवासी भागातून विमानतळांद्वारे विविध प्रकारच्या शेतीमाल (फळे, भाज्या, मांस, मासे, डेअरी उत्पादने इ.) वाहतुकीवर भर देऊन, योजना अंतर्गत ईशान्य, डोंगराळ आणि आदिवासी भागासाठी 25 विमानतळ निवडण्यात आले आहेत, तर इतर भागांमध्ये 33 विमानतळांचा समावेश आहे.

कृषी उडान योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी कृषी विभाग, नागरी विमान वाहतूक मंत्रालय, पशुपालन आणि डेअरी विभाग, मत्स्य विभाग, अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय, वाणिज्य विभाग, आदिवासी विकास मंत्रालय आणि पूर्वोत्तर प्रदेश विकास मंत्रालय अशी आठ केंद्रीय मंत्रालये योग्य समन्वय साधून काम करत आहे. हवाई मालवाहतुकीद्वारे कृषी उत्पादनाची वाहतूक सुलभ करुन त्यास प्रोत्साहन देण्यासाठी विमान प्राधिकरण भारत (एएआय) व सरंक्षण मंत्रालयाने विमानतळ शुल्क, पार्किंग शुल्क इ. सवलती देखील या योजनेअंतर्गत प्रदान केल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पदानांना देश विदेशात जलद आणि सुरक्षितरित्या पोहोचवण्यास मदत होईल व त्यांना उत्पादनाच्या विक्रीतून अधिक उत्पन्न मिळू शकणार आहे.

error: Content is protected !!