Krushi Utpanna Bazar Samiti: नाशिक जिल्ह्यातील 15 प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील कांदा व शेतमाल लिलाव बंद!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर (Krushi Utpanna Bazar Samiti) नाशिक (Nashik) जिल्ह्यातील 15 प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील (Krushi Utpanna Bazar Samiti) कांदा व शेतमाल लिलाव (Agriculture Auction) बंद झाला आहे. त्यामुळे शेतकरी (Farmer) अडचणीत आला आहे. बाजार समित्यांमध्ये आणलेला शेतमालाची (Agriculture produce) विक्री होत नाही. गेल्या आठ दिवसांपासून हा प्रकार सुरु आहे. माथाडी कामगारांनी हमाली, तोलाई आणि वाराई कपात करू नये या प्रश्नी बंद सुरु आहे. यामुळे 125 हून अधिक कोटी रूपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. बंदीमुळे शेतकरी अडचणीत आला असताना बंद (Krushi Utpanna Bazar Samiti) मागे न घेतल्यास देशात कांद्याची टंचाई (Onion Shortage) निर्माण होणार आहे. त्याचा फटका ग्राहकांना बसणार आहे.

काय आहे विषय (Krushi Utpanna Bazar Samiti)

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी वर्गाच्या हिशोब पट्टीतून हमाली, तोलाई, वराई कपाती संदर्भात निर्णय होत नाही. 2008 पूर्वी हमाली, तोलाई, वाराई ही रक्कम लेव्हीसह शेतकर्‍यांकडून कपात केली जात होती. 2008 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने शेतकर्‍यांच्या हिशोब पावतीतून रक्कम कपात करावी, असा निर्णय दिला. परंतु लेव्ही रक्कम कोणी अदा करावी याबाबत निर्णय दिला नव्हता. महाराष्ट्र शासनाने खरेदी दाराकडून वसूल करावी असा निर्णय दिला होता.

शासनाच्या निर्णयास विरोध

लेव्हीची रक्कम खरेदीदाराकडून वसूल करण्यास नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीमधील व्यापारी असोसिएशनने विरोध केला. त्यांनी उच्च न्यायालयात (High Court) याचिका दाखल केली. त्यावर निर्णय देताना न्यायालयाने हमाली, तोलाई, वराई कामकाज करणाऱ्या माथाडी कामगारांचे मालक कोण? याचा निर्णय जिल्हा न्यायालयात घ्यावा असा निर्णय दिला. त्यानंतर निफाड वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाने 20 सप्टेंबर 2023 रोजी दिलेल्या आदेशाप्रमाणे माथाडी बोर्डाने नाशिक जिल्ह्यातील व्यापार्‍याकडे थकीत असलेली लेव्ही व दंडात्मक रक्कम वसूली संदर्भात नोटिसा दिल्या. त्यानुसार व्यापारी वर्गाने असा निर्णय घेतला की 1 एप्रिल 2024 पासून हमाली, तोलई, वाराही रक्कम शेतकर्‍यांच्या हिशोब पावतीतून कपात न करण्याचा निर्णय घेतला.

अखेर सुरु झाला बंद

माथाडी-मापारी कामगारांच्या हमाली, तोलाई व वाराई कपातीसह लेव्ही संदर्भात सर्वमान्य तोडगा निघे पावेतो बंद पुकारला. 04 एप्रिल पासून हा बंद सुरु आहे. यामुळे नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या (Krushi Utpanna Bazar Samiti) बंद आहेत. यामुळे कोट्यवधींची उलाढाल ठप्प असून शेतकऱ्यांना नुकसान होणार आहे.

error: Content is protected !!