Kubota L4508 Tractor : कुबोटा ट्रॅक्टर्सची शेतकऱ्यांमध्ये क्रेझ; वाचा, ‘कुबोटा एल4508’ ट्रॅक्टरची किंमत!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशासह महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये सध्या कुबोटा कंपनीच्या (Kubota L4508 Tractor) जपानी तंत्रज्ञानाने युक्त ट्रॅक्टर्सची मोठी क्रेझ आहे. घरासमोर कुबोटा ट्रॅक्टर असणे म्हणजे सध्या मोठा धनी मानला जातो. मात्र, आता तुमच्याकडे जमीन कमी असेल. परंतु, तुम्ही एखाद्या दमदार आणि शक्तीशाली कंपनीचा ट्रॅक्टर घेण्याचा विचार करत असाल. तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कुबोटा या कंपनीचा ‘कुबोटा एल4508’ हा 45 एचपीचा छोटा ट्रॅक्टर (Kubota L4508 Tractor) मध्यम शेतकऱ्यांसाठी परफेक्ट ठरतो. आज आपण या ट्रॅक्टरबद्दल सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

‘कुबोटा एल4508’ ट्रॅक्टरबद्दल (Kubota L4508 Tractor For Farmers)

कुबोटा कंपनीचा ‘कुबोटा एल4508’ हा छोटा ट्रॅक्टर 2197 सीसी क्षमतेसह 4 सिलेंडरमध्ये वॉटर कुलिंग सिस्टिमसह उपलब्ध आहे. हा ट्रॅक्टर प्रामुख्याने 45 एचपी इतकी पॉवर जनरेट करतो. कंपनीने आपल्या या ट्रॅक्टरला ड्राय एअर क्लिनर दिलेला आहे. कुबोटा कंपनीचा हा छोटा ट्रॅक्टर कमीत कमी 37.6 एचपी पीटीओ पॉवरसह उपलब्ध असून, तो 2600 आरपीएमची निर्मिती करतो. कंपनीने आपल्या या कुबोटा ट्रॅक्टरला 42 लीटर क्षमतेची डिझेल टाकी दिलेली आहे. कंपनीने आपल्या ट्रॅक्टरला 1300 किलोग्रॅम इतके वजन उचलण्याची क्षमता दिलेली असून, त्याचे एकूण वजन हे 1365 इतके आहे. आपल्या या छोट्या ट्रॅक्टरची कंपनीकडून 3120 एमएम लांबी आणि 1495 एमएम रूंदीसह 1845 एमएम व्हीलबेसमध्ये निर्मिती करण्यात आली आहे. कंपनीने आपल्या या ट्रॅक्टरला 385 एमएम इतका ग्राउंड क्लीयरन्स दिलेला आहे.

‘कुबोटा एल4508’ ट्रॅक्टरचे फीचर्स

  • कुबोटा कंपनीच्या ‘कुबोटा एल4508’ या छोट्या ट्रॅक्टरला (Kubota L4508 Tractor) कंपनीकडून हायड्रॉलिक पॉवर स्टीयरिंग देण्यात आली आहे.
  • कंपनीने आपल्या या ट्रॅक्टरला पुढील बाजूस 8 गिअर आणि 4 रिव्हर्स गिअर दिलेले आहे.
  • कुबोटाने आपल्या एल सीरिजच्या या छोट्या ट्रॅक्टरला पुढील बाजूस 28.5 किमी प्रतितास इतका वेग दिलेला आहे.
  • या ट्रॅक्टरला कंपनीने ड्राय टाईप सिंगल क्लच दिला आहे. ज्यास कॉन्स्टंट मेश टाईप ट्रांसमिशन देण्यात आले आहे.
  • कंपनीकडून या ट्रॅक्टरला ऑइल इमर्जड ब्रेक्स देण्यात आले आहे.
  • कुबोटाचा हा ट्रॅक्टर मल्टि स्पीड पीटीओ पॉवर टेक ऑफसह येतो. जो 540 / 750 आरपीएमची निर्मिती करतो.
  • हा ट्रॅक्टर 4 WD ड्राइवसह उपलब्ध असून, त्याला पुढील बाजूस 8.00 x 18 आकारात तर मागील बाजूस 13.6 x 26 / 12.4 x 28 आकारात टायर देण्यात आले आहे.

किती आहे किंमत?

कुबोटा कंपनीने ‘कुबोटा एल4508’ या छोट्या ट्रॅक्टरची शोरूम किंमत संपूर्ण भारतामध्ये 8.85 लाख रुपये इतकी निर्धारीत केली आहे. आरटीओ रजिस्ट्रेशन आणि रोड टॅक्समुळे देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये या ‘कुबोटा एल4508’ या छोट्या ट्रॅक्टरची ऑन रोड किंमत ही वेगवेगळी राहू शकते. कंपनीने आपल्या या ट्रॅक्टरला 5 वर्षांची वॉरंटी दिलेली आहे.

error: Content is protected !!