Kubota Tractor : कुबोटाचा 50 एचपीचा रुबाबदार, दणगट ट्रॅक्टर; वाचा कितीये किंमत?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : ‘ट्रॅक्टरशिवाय (Kubota Tractor) शेती करणे’ ही कल्पना देखील केली जाऊ शकत नाही. शेतीमध्ये यंत्राचा वापर वाढला आहे. त्यामुळे काळासोबतच सर्व शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा मदतीने शेती करणे क्रमप्राप्त ठरत आहे. त्यामुळे आता तुम्ही देखील आपल्या शेतीसाठी एखादा रुबाबदार, तितकाच दणगट आणि शक्तिशाली ट्रॅक्टर घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आपण जपानी तंत्रज्ञानाचे इंजिन असलेल्या 50 एचपी क्षमतेच्या ‘कुबोटा एमयू 5502 फोर डब्ल्यूडी’ ट्रॅक्टरबद्दल (Kubota Tractor) सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

‘कुबोटा एमयू 5502 फोर डब्ल्यूडी’ ट्रॅक्टरबद्दल (Kubota Tractor 50 HP For Farmers)

कुबोटा ही ट्रॅक्टर (Kubota Tractor) निर्मिती उद्योगातील आघाडीची कंपनी असून, कंपनीने ‘कुबोटा एमयू 5502 फोर डब्ल्यूडी’ ट्रॅक्टरला 2434 सीसी क्षमतेसह 4 सिलेंडरमध्ये तयार केले आहे. हा ट्रॅक्टर 50 एचपी पॉवर जनरेट करतो. कंपनीने आपल्या या ट्रॅक्टरला ड्राय टाईप, ड्युअल एलिमेंट एयर फिल्टर दिलेला आहे. कुबोटा एमयू 5502 फोर डब्ल्यूडी या शक्तिशाली ट्रॅक्टरची कमीत कमी पीटीओ पॉवर 47 एचपी इतकी आहे. याशिवाय या ट्रॅक्टरचे इंजिन 2300 आरपीएमची निर्मिती करते. कंपनीने आपल्या या ट्रॅक्टरला 65 लीटर क्षमतेची डिझेल टाकी दिलेली आहे. कंपनीने या ट्रॅक्टरला पुढील बाजूस 1.8 – 30.8 किलोमीटर तर मागील बाजूस 5.1 ते 14.0 किलोमीटर इतका वेग दिला आहे. हा ट्रॅक्टर 1800 ते 2100 किलो वजन उचलू शकतो.

काय आहेत फीचर्स?

  • कुबोटा एमयू 5502 फोर डब्ल्यूडी ट्रॅक्टरला पॉवर स्टीयरिंग देण्यात आले आहे.
  • पुढील बाजूस 12 तर मागील बाजूस 4 रिव्हर्स गिअरसह गियरबॉक्स देण्यात आला आहे.
  • या ट्रॅक्टरला ड्युअल टाइप क्लच सिंक्रोमेशसह उपलब्ध आहे.
  • कंपनीने आपल्या या ट्रॅक्टरला ऑइल इमर्जड मल्टि डिस्क ब्रेक्स दिले आहेत.
  • कुबोटा कंपनीचा हा ट्रॅक्टर (Kubota Tractor) इंडिपेंडेंट ड्युअल पीटीओ पॉवर टेकऑफ उपलब्ध आहे.
  • कुबोटाचा हा ट्रॅक्टर फोर व्हील ड्राइवसह उपलब्ध आहे.
  • या ट्रॅक्टरला पुढील बाजूस 9.50 X 24 आकारात आणि मागील बाजूस 16.9 X 28 आकारात टायर दिलेले आहे.

किती आहे किंमत?

कुबोटा कंपनीने संपूर्ण देशभरात ‘कुबोटा एमयू 5502 फोर डब्ल्यूडी’ या शक्तिशाली ट्रॅक्टरची किंमत 11.35 लाख ते 11.89 लाख रुपये इतकी निर्धारित केली आहे. विविध राज्यांमध्ये आरटीओ रजिस्ट्रेशन आणि रोड टॅक्स वेगवेगळा असल्याने, वेगवेगळ्या राज्यांमध्ये या ट्रॅक्टरची किंमत वेगवेगळी राहू शकते. कंपनीने आपल्या या ट्रॅक्टरला 5000 तास किंवा 5 वर्ष यापैकी जे अगोदर पूर्ण होईल. तितक्या क्षमतेत वॉरंटी प्रदान केलेली आहे.

error: Content is protected !!