शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! ‘या’ सरकारी योजनेचा लाभ घ्याल तर 5 लाख रुपयांचे होतील 10 लाख; कसे ते जाणून घ्या..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । KVP म्हणजेच किसान विकास पत्र ह्या योजनेत आता ५ महिन्यांपूर्वी तुमचे पैसे दुप्पट होतील. आता 5 लाख रुपयांऐवजी ऐवजी तब्बल 10 लाख रुपये लाभार्थ्याला मिळणार आहेत. या योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत याबाबत सविस्तर माहिती आम्ही इथे सांगणार आहोत.

किसान विकास पत्र (KVP) ही पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून चालवली जाणारी सरकारी योजना आता पूर्वीपेक्षा चांगल्या स्वरूपात राबवली जात आहे. केंद्र सरकारने किसान विकास पत्रावरील व्याजदर १ एप्रिलपासून वार्षिक ७.२ टक्क्यांवरून ७.५ टक्के केले आहे. या योजनेत आता मॅच्युरिटी कालावधी हा 5 महिन्यांनी कमी झाला असून पूर्वी, जिथे या योजनेत पैसे दुप्पट करण्यासाठी 120 महिने लागायचे तिथेच आता ते केवळ 115 महिन्यांत दुप्पट होतील.

सरकारी अनुदान मिळवण्यासाठी येथे क्लिक करून App डाउनलोड करा

किसान विकास पत्र ही भारत सरकारने सुरु केलेली एक गुंतवणूक योजना आहे ज्यात तुम्ही एकदा भरलेली रक्कम हि १२० महिन्यांनी दुप्पट होते. हि योजना देशातील सर्वच पोस्ट ऑफिस तसेच काही बँकांमध्ये आजही राबवली जाते. ह्या योजनेच्या अंतर्गत तुम्ही किमान 1000 रुपयांची गुंतवणूक करु शकता तर कमाल गुंतवणुकीवर कोणतीही मर्यादा नाही.

कोण कोण या योजनेत गुंतवणूक करू शकतो?

ही योजना शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी तयार केलेली योजना असून या योजनेत आपले पैसे गुंतवल्यावर दीर्घकालीन मुदतीच्या आधारावर ते दुप्पट करू शकतात. किसान विकास पत्रामध्ये गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीचे वय किमान १८ वर्षे असणे आवश्यक आहे. ह्या योजने करीता सिंगल अकाऊंट व्यतिरिक्त जॉइंट अकाउंटचीही सुविधा करण्यात आली आहे जेणे करून एकाच कुटुंबातील एकाहून अधिक जण ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

तसेच KVM योजना अल्पवयीन मुलांसाठी देखील उपलब्ध आहे. ज्याची जबाबदारी हि त्यांच्या पालकांवर असेल. किसान विकास पत्रामध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांना काही अटी आणि परिस्थितीत खाते हस्तांतरित करण्याची सुविधा देण्यात आली आहे. किसान विकास पत्राच्या खातेधारकाचा मृत्यू झाल्यास, खाते त्याच्या नॉमिनी किंवा कायदेशीर वारसाकडे हस्तांतरित केले जाईल. यासोबतच, कोणत्याही संयुक्त खातेदाराचा मृत्यू झाल्यास, न्यायालयाच्या आदेशाने खाते हस्तांतरित केले जाऊ शकते.

किसान विकास पत्र अर्थात KVP देखील संयुक्तपणे खरेदी केले जाऊ शकते….

किसान विकास पत्र हे 1000 रुपये, 5000 रुपये, 10,000 रुपये आणि 50,000 रुपयांच्या प्रमाणपत्र स्वरूपात उपलब्ध आहेत, जी त्या रकमेत किंवा तुमच्या क्षमतेनुसार पटीत खरेदी केली जाऊ शकतात. किसान विकास पत्र घेण्यासाठी तुमच्याकडे KYC प्रक्रियेसाठी ओळख पुरावा म्हणून आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, किसान विकास पत्र अर्ज, पत्ता पुरावा, जन्म प्रमाणपत्र. ही कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

अर्ज कसा करावा?

शेतकरी मित्रांनो कोणत्याही सरकारी योजनेला अर्ज करणे आता अतिशय सोपे झाले आहे. तुमच्या मोबाईलवर हॅलो कृषी मोबाईल अँप असेल तर आता सर्व शासकीय अनुदान सहज आपल्या खात्यावर जमा होते. यासाठी तुम्हाला सर्वप्रथम गुगल प्ले स्टोरला जाऊन Hello Krushi असं नाव सर्च करून अँप डाउनलोड करावे लागेल. या अँपवरून शेतकरी जमीन मोजणी, सातबारा उतारा डाउनलोड करणे, हवामान अंदाज जाणून घेणे, रोजचा बाजारभाव चेक करणे आदी सेवांचा मोफत लाभ घेऊ शकतो.

तुम्ही तुमच्या विभागातील पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन किसान विकास पत्र फॉर्म भरून खाते उघडू शकता. याशिवाय हा फॉर्म ऑनलाइनही डाउनलोड करता येईल. फॉर्मवर नॉमिनीचे पूर्ण नाव, जन्मतारीख आणि पत्ता लिहावा. फॉर्ममध्ये खरेदीची रक्कम स्पष्टपणे नमूद करावी. किसान विकास पत्र फॉर्मची रक्कम चेकने किंवा रोखीने भरली जाऊ शकते. चेकद्वारे पेमेंट करत असल्यास, कृपया फॉर्मवर चेक नंबर नमूद करावा. कोणत्या आधारावर एकट्याने किंवा संयुक्तपणे खरेदी केले जात आहे ते फॉर्ममध्ये नमूद करा. जर ती एकत्रितपणे खरेदी केली जात असेल तर दोन्ही लाभार्थ्यांची नावे स्पष्टपणे नमूद करावीत.

योजनेत गुंतवणूक केल्यास कर लाभ मिळेल की नाही?

लाभार्थी अल्पवयीन असल्यास, त्याची जन्मतारीख, पालकांचे नाव, पालकाचे नाव नमूद केले पाहिजे. फॉर्म सबमिट केल्यावर, किसान विकास प्रमाणपत्रावर लाभार्थीचे नाव, मॅच्युरिटी तारीख आणि मॅच्युरिटी रक्कम प्रदान केली जाईल. किसान विकास पत्रात गुंतवणूक केल्यावर, तुम्हाला कमावलेल्या नफ्याच्या रकमेवर कर भरावा लागेल, तर इतर योजना राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र आणि PPF खात्यावर मिळणारे व्याज करमुक्त आहे. आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत दिलेली सूट या योजनेला लागू होत नाही. म्हणजेच, तुम्ही केलेली गुंतवणूक आयकराच्या कक्षेत राहील, तर PPF खाते आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रात केलेली गुंतवणूक कलम 80C अंतर्गत करमुक्त आहे. याशिवाय बँकांमध्ये 5 वर्षांसाठी मुदत ठेवींमध्ये केलेल्या गुंतवणुकीला कलम 80C अंतर्गत कर सूट मिळते.

error: Content is protected !!