50 देशी गायींच्या शेणखतातून करतात शेंद्रीय शेती; मिळवतात लाखोंचे उत्पादन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी । रासायनिक पद्धतीच्या शेतीतून हजारोंचा खर्च करून शेती करणारे अनेक शेतकरी आपल्या आसपास आहेत. रासायनिक शेतीमुळे आर्थिक नुकसान तर होतेच पण त्यातून निर्यातीला आणि आरोग्यावरही विपरीत परिणाम होतो. अकोल्यातील म्हैसांग येथील शेतकरी हेमंतराव देशमुख यांनी रासायनिक शेतीतून लाखोंचा फायदा मिळवून यशस्वितेची किमया करून दाखविली आहे. 50 देशी गाईंच्या संगोपनातून व त्यांच्या गोमूत्र, शेणखताच्या उपयोगितेतून ते दरवर्षी 100 एक्करातून लाखोचे उत्पन्न घेत आहेत.

कोट्यवधी लोकांच्यासाठी अन्न पुरावे यासाठी पीक उत्पादन वाढवावे लागणार. आणि उत्पादन वाढवायचे म्हटले तर, रासायनिक खतांचा भडीमार करावाच लागणार ही संकल्पना आता सर्वसामान्य शेतकऱ्याच्या डोक्यात रूढ झाली आहे. आणि त्यातूनच देशभरात शेतामध्ये आवश्‍यकतेपेक्षाही अधिक प्रमाणात रासायनिक खतांचा उपयोग केला जातो. रासायनिक खतांच्या अशा उपयोगितेतून मोठ्या प्रमाणात शेतीचा लागवड खर्च वाढत आहे आणि दुसरीकडे पोषक अन्नधान्य निर्मिती सुद्धा अशक्य होत आहे. पण देशी गायींच्या संगोपनातून शेंद्रीय शेती करणारे शेतकरी हेमंतराव देशमुख यांनी या विचारांना बगल दिली आहे. ते सांगतात की, ‘आजोबा-पंजोबांपासून त्यांच्याकडे केवळ शेतीसाठी गाईंचे संगोपन केले जाते. कधी काळी त्यांचेकडे 200 हून अधिक गायींचे संगोपन व्हायचे. आताही त्यांचेकडे 50 हून अधिक देशी गाई असून, त्यांच्या संगोपनातून केवळ गोमूत्र व शेणखत ते घेत असतात. कालवडी, वासरांचे योग्य पोषण होऊन चांगले गोधन तयार व्हावे यासाठी ते या गाईंचे दूध सुद्धा काढत नाहीत. त्यांच्या राहत्या घरात त्यांनी या गाईंचे संगोपन केले असून, त्यामुळे अंगणात, घरात सदैव प्रसन्नता लाभत असल्याचे ते सांगतात. त्यातून त्यांना चांगला फायदा होत असल्याचेही ते बोलतात.

गौपालन केल्यावर निर्माण होणाऱ्या गोमूत्र आणि शेणखताचा उपयोग शेतात करून रासायनिक खतांवर पर्याय म्हणून त्याचा वापर केला जातो. म्हैसाग म्हणजेच खारपान पट्ट्याचा भाग. या भागात हेंमतराव देशमुख यांची 100 एक्कर शेती असून, त्यावर दरवर्षी ते लाखोचे सोयाबीन, तूर, हरभरा उत्पादन घेत असतात. गेल्या 30 वर्षांपासून ते या शेतात रासायनिक खतांचा उपयोग करीत नसून, शेणखताचा योग्य व मापक वापरातून अपेक्षेपेक्षाही अधिक पीक उत्पादन मिळत असल्याचे ते सांगतात. प्रत्येक फवारणीत ते गोमूत्राचा उपयोग करतात आणि त्यामुळे कीड नियंत्रण, तण नियंत्रण होऊन भरघोस व खात्रीचे पीक उत्पादन ते घेतात.यातून अनेक शेतकरू प्रेरणा घेत असून शेंद्रीय शेतीबद्दल अनेक शेतकऱ्यांच्या मनात असलेले गैरसमज दूर होण्यास मदत होत असून अनेक शेतकरी यातून प्रेरणा घेत आहेत.

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा

Leave a Comment

error: Content is protected !!