लॉकडाऊनमध्ये नोकरी गेली, पण खचला नाही; भेंडीच्या शेतीतून केली बेरोजगारीवर मात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी | करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये अनेक ठिकाणी परिस्थिती अतिशय हाताबाहेर गेली होती. अनेक कंपन्या बंद पडल्यामुळे अनेक तरुण बेरोजगार झाले होते. पण, काही तरुणांनी अशा विपरीत परिस्थितीमध्ये हार न मानता पुन्हा उभे राहण्याचे धाडस दाखवले. अहमदनगरमधील शेवगाव तालुक्यातील भावीनिमगाव येथील एका तरुणाची सुद्धा नोकरी या लॉकडाऊनमध्ये गेली पण त्याने भाजीपाल्याची शेती करून बेरोजगारीवर मात केली. आणि कुटुंब सावरले.

रावसाहेब शेळके असे या शेतकऱ्याचे नाव असून, तो दहा वर्षापासून औरंगाबाद येथील एका कंपनीमध्ये नोकरीला होता. लॉकडाऊनमध्ये कंपनी बंद झाली आणि रावसाहेब यांची नोकरी गेली. त्यामुळे तो शहर सोडून पत्नी आणि दोन मुलींना घेऊन गावाकडे आला. गावाकडे आल्यानंतर वडिलोपार्जित शेतीमध्ये त्याने लक्ष देण्यास सुरुवात केली. पाऊन एकर शेतीमध्ये भेंडीचे उत्पादन घेतले. व त्याला उत्पादनासाठी चांगला भावही मिळाला.

भेंडीच्या झालेले उत्पादन त्याने अहमदनगर येथे आणून विकले. त्याला प्रति किलो भेंडीसाठी त्याला 35 ते 40 रुपये भाव मिळाला. यातून त्याचे उत्पादन दीड लाखापर्यंत झाले. यासोबतच, रावसाहेबाने शेतीमध्ये कोथिंबीरही लावली आहे. त्यातूनही, चांगले उत्पादन होण्याची अपेक्षा आहे. यामुळे आलेल्या संकटावर हार न मानता त्याच्याशी दोन हात करून, त्यावर मात करावी. असा संदेश रावसाहेब नाहीतर शेतकऱ्यांना दिला आहे.

 

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा

Leave a Comment

error: Content is protected !!