Lal Sindhi Cow: लाळ्या खुरकुत रोगास प्रतिकारक ‘लाल सिंधी गाय’ जाणून घ्या माहिती!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: भारतात दूध उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या गायींच्या जातीत लाल सिंधी (Lal Sindhi Cow) गायीला विशेष महत्व आहे. मुख्यत: दूध उत्पादनासाठी (Milk Production) वापरल्या जाणाऱ्या या गायींची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहेत. जाणून घेऊ या गायीच्या जातीविषयी (Cow Breed) माहिती.   

उगम (Origin Of Lal Sindhi Cow)

या गायीचा उगम पाकिस्तान (Pakistan) येथील कराची तसेच भारतातील हैद्राबाद, बिकानेर येथे झाला आहे.  सध्या ही गाय हरियाणा, कर्नाटक, केरळ, ओडिशा आणि पंजाब मध्येही मोठ्या प्रमाणात पाळली जाते. यूपी आणि बिहारमधील काही शेतकरी या गायींच्या संगोपनाचे कामही करत आहेत. ऑस्ट्रेलिया, श्रीलंका ब्राझील आणि अमेरिका या देशातही या जाती आढळतात.

शरीर रचना

या जातीच्या गायीचे शरीर गडद ते फिकट लाल रंगाचे असते. त्यांच्या शरीरावर पांढरे पट्टेही दिसतात. लाल सिंधी जातीची गाय मध्यम आकाराची असते. सिंधी गायीचे डोके रूंद, शिंगे लहान व जाड, शेपटी लांब व पाय लहान असतात. या जातीच्या गायीचे सरासरी वजन 3.15 क्विंटल आणि उंची सुमारे 115 सें. मी. बैलाचे सरासरी वजन 4.5 क्विंटल आणि उंची सुमारे 132 सेमी असते.

प्रजो‍त्पादन आणि उत्पादन (Milk Production Of Lal Sindhi Cow)

या गायीचा प्रथम माजावर येण्याचा कालावधी हा 39 ते 50 महिन्याचा असतो.  

दूध देण्याचा कालावधी 270 दिवस असून सरासरी दूध उत्पादन 1188 ते 1675 लिटर आहे. ही गाय एका दिवसात 6 ते 8 लिटर दूध देते.

इतर विशेषता (Lal Sindhi Cow)

या गायीचे सरासरी आयुष्य 15 वर्षाचे असते. उष्णता, टिक प्रतिकार, रोग प्रतिकार, उच्च तापमानात प्रजनन इत्यादी सहन करण्याच्या क्षमतेमुळे लाल सिंधी गायी शतकानुशतके वापरली गेली आहे. लाल सिंधी गुरांचे संगोपन प्रामुख्याने भारतात दुग्धशाळेच्या जाती म्हणून केले जाते. पण इतर देशांमध्ये ते मांसासाठी देखील वाढवले ​​जाते. या गायीची थायलेरीयासिस (Thieleriasis) आणि लाळ्या खुरकुत (FMD) रोगासाठी चांगली रोगप्रतिकारशक्ती असते. बैल शेती व वाहतुकीच्या कामासाठी उपयुक्त असतात. ती आकाराने लहान व बदलत्या हवामानाशी समरस होऊ शकतात.

error: Content is protected !!