Land Buying and Selling: 5 गुंठे जमिनीची करता येणार खरेदी विक्री; घ्यावी लागेल जिल्हाधिकाऱ्याची मंजूरी!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: महाराष्ट्र शासनाने (Land Buying And Selling) नुकताच एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे ज्या अंतर्गत आता एक ते पाच गुंठ्यांच्या जमिनीची खरेदी-विक्री जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने करता येईल. यापूर्वी, बागायती क्षेत्रासाठी किमान 10 गुंठे आणि जिरायती क्षेत्रासाठी किमान 20 गुंठे जमिनीची थेट खरेदी-विक्री करता येत होती.

अनेकदा शेतरस्ता, घरकुल बांधकाम किंवा विहिरीसाठी एक ते पाच गुंठे जमिनीची गरज भासते. मात्र, कमी क्षेत्रामुळे अशा जमिनींची खरेदी-विक्री करणे शक्य होत नव्हते. या नवीन निर्णयामुळे अशा छोट्या जमिनींच्या व्यवहारांना चालना मिळेल (Land Buying And Selling).

अर्ज कसा करावा?

जमिनीच्या हस्तांतरणासाठी अर्जदारांना महसूल व वन विभागाकडे अर्ज करावा लागेल. अर्जामध्ये खरेदी-विक्री (Land Buying And Selling) करणार्‍याचे नाव, गाव, गट क्रमांक, विहिरीचा आकार (जर विहिरीसाठी जमीन हस्तांतरित होत असेल तर), शेत रस्त्याची लांबी-रुंदी (जर शेत रस्त्यासाठी जमीन हस्तांतरित होत असेल तर), भूजल सर्वेक्षण व विकास अभिकरणाचे ना-हरकत प्रमाणपत्र, सहधारकांचे संमतिपत्र इत्यादी कागदपत्रांचा समावेश करावा लागेल.

मंजूरीची प्रक्रिया

अर्ज प्राप्त झाल्यानंतर, जिल्हाधिकारी संबंधित जमिनीची तपासणी करतील आणि योग्य वाटल्यास मंजूरी देतील. मंजूरी एका वर्षासाठी वैध असेल आणि अर्जदाराच्या विनंतीवरून दोन वर्षांसाठी मुदतवाढ मिळू शकेल.

  • शेतरस्ता, घरकुल बांधकाम आणि विहिरी बांधणी यांसारख्या गरजा पूर्ण करणे सोपे होईल.
  • जमिनींच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता वाढेल.
  • छोट्या शेतकर्‍यांना त्यांच्या जमिनींचा अधिक चांगल्या प्रकारे उपयोग करता येईल.

अधिक माहितीसाठी, आपण आपल्या जिल्ह्यातील महसूल व वन विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधू शकता.

error: Content is protected !!