Land Record : वारस नोंदणीसाठी आता तलाठ्याकडे जाण्याची गरज नाही, मोबाइलवरच करता येणार संपूर्ण प्रक्रिया; हे App करेल कामे सोपी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Land Record : आपल्या घरातील जर कर्त्या पुरुषाचे निधन झाले तर त्यांच्या वारसाची नोंद सातबारा उताऱ्यावर घेण्यासाठी आपल्याला तलाठी कार्यालयामध्ये जाऊन हेलपाटे मारावे लागतात. मात्र अनेक वेळा तलाठी कार्यालयामध्ये जाऊन देखील आपले काम होत नाही. कधी अधिकारी नसतात तर कधी इतर काही अडचणींमुळे आपल्याला तलाठी कार्यालयात सतत हेलपाटे मारावे लागतात. यावेळी सामान्य नागरिकांची त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पिळवणूक देखील होत असते.

मात्र आता तुम्हाला जर वारसाची नोंद सातबारावर लावायची असेल तर टेन्शन घ्यायची गरज नाही यासाठी तुम्ही घरी बसून ऑनलाईन पद्धतीने तुमच्या मोबाईलवरून अर्ज करू शकता. यासाठी Hello Krushi नावाचे खास मोबाईल अँप बनवण्यात आले असून शेती निगडित सातबारा उतारा, जमीन मोजणी, भूनकाशा, बाजारभाव अशा अनेक सेवा या अँपवर मोफत देण्यात येत आहेत. तुम्हीसुद्धा आजच तुमच्या मोबाईलवर गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi अँप डाउनलोड करून शासकीय योजनांचा लाभ घेऊ शकता.

घरातील कर्त्या पुरुषाचे निधन झाल्यानंतर त्याच्या वारसाची नोंद सातबारा उताऱ्यावर घेण्यासाठी आता तुम्ही घरी बसून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. याची सोयी सुविधा भूमी अभिलेख विभागाने सुरू करून दिली आहे. महसूल सप्ताह निमित्त एक ऑगस्टपासून भूमी अभिलेख विभागाने राज्यभर ही सुविधा चालू केली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नागरिकांना देखील मोठा दिलासा मिळाला आहे. कारण की आता यामुळे नागरिकांचा ताण कमी होणार असून प्रत्येक जण आपले स्वतः च काम करू शकणार आहे.

भूमी अभिलेख विभागाने जास्तीत जास्त सुविधा या ऑनलाईन उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये डिजिटल सातबारा (Digital Satbara) उतारा असेल इ फेरफार या खूप सुविधांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर कोरोना महामारीच्या काळात अनेक नागरिकांनी ऑनलाईन सुविधांचा वापर वाढविला असल्याचे लक्षात येत आहे. त्यामुळेच या नागरिकांचा विचार करून भू मी अभिलेख विभागाने हा निर्णय घेतला आहे. हॅलो कृषी हे मोबाईल अँप शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त असून यावर भूमिअभिलेखच्या सेवांसोबतच हवामान अंदाज, जमीन खरेदी विक्री, सरकारी योजना अर्ज करणे अशा विविध शेतकऱ्यांच्या फायद्याच्या बाबी देण्यात आल्या आहेत.

तलाठी कार्यालयात चकरा मारणे बंद

भूमी अभिलेख विभागाच्या या निर्णयामुळे नागरिकांना सातबारा उतारा घेण्यासाठी तलाठी कार्यालयामध्ये चकरा माराव्या लागणार नाहीत. यासाठी डिजिटल सातबारा उपलब्ध करून दिलेला आहे. त्याचबरोबर आता नागरिकांना वारसाची नोंदणी करण्यासाठी देखील तलाठी कार्यालयामध्ये हेलपाटे मारावे लागू नये म्हणून वारस नोंदणी सुविधा देखील ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आली आहे. एक ऑगस्टपासून ही सुविधा संपूर्ण राज्यात चालू करण्यात आली आहे.

याआधी कशी होती पद्धत

याआधी जर कोणाला वारस नोंदणी लावायची असेल तर त्यासाठी त्यांना तलाठी कार्यालयामध्ये जाऊन अर्ज करावा लागत होता. मात्र आता तुम्हाला जर मृत व्यक्तीची वारस नोंदणी लावायची असेल तर तुम्हाला मोबाईलवर जाऊन फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

वारस नोंदीसाठी ‘असा’ करा ऑनलाइन अर्ज..

मृत व्यक्ती नंतर त्यांच्या सर्व वारसांची नोंद करण्यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरून Hello Krushi अँप डाउनलोड करून घ्यायचे आहे. अँप ओपन केल्यानंतर आम्ही खाली दिलेल्या स्टेप्स फॉलोअ कराव्यात. लॉगिन करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. हा अर्ज केल्यानंतर हा ऑनलाईन अर्ज संबंधित तलाठ्याकडे पाठवला जाईल. त्यानंतर तलाठी या अर्जाची ऑनलाईनच पडताळणी करतील जर तुम्ही यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कमी दिली असतील तर याबाबतची माहिती अर्जदाराला मेलद्वारे पाठवण्यात येईल आणि जर तुमची कागदपत्रे संपूर्ण असतील तर त्याची नोंद सातबारा उताऱ्यावर करून देण्यात येणार आहे. त्यामुळे आता भूमी अभिलेख विभागाच्या या निर्णयामुळे अनेक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

1) सर्वप्रथम तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरून Hello Krushi हे मोबाईल अँप डाउनलोड करून घ्यायचे आहे.

2) Hello Krushi अँपवर नाव, मोबाईल नंबर आदी माहिती भरून मोफत रजिस्टर केल्यानंतर आता अँप ओपन करताच तुम्हाला होम स्क्रीनवर सरकारी योजना अशा विभाग दिसेल. त्यावर क्लिक करा.

3) आता तुम्हाला वारस नोंद हा पर्याय निवडायचा आहे. इथे सर्व माहिती देण्यात आली असून खाली Apply Now असे बटन दिसेल.

4) Public Data Entry या पेजवर रिडायरेक्ट केल्यानंतर सर्वात शेवटी ‘Proceed to login’वर क्लिक करून आधी स्वत:चे ऑनलाइन खाते उघडा.

5) त्यानंतर मोबाईल, पॅन नंबर, ई-मेल, पिन कोड टाका. देश, राज्य, जिल्हा टाकल्यावर ‘Select City’ मध्ये गाव निवडा. त्यानंतर Address Details मध्ये घराची माहिती टाका. शेवटी कॅप्चा टाका आणि ‘सेव्ह’ म्हणा.

6) त्यानंतर पेजखाली एक लाल अक्षरातील मेसेज दिसेल. त्यानंतर ‘Back’ बटणावर क्लिक करून पुन्हा एकदा लॉग-इन करा.

7) नोंदणी करताना टाकलेले यूझरनेम व पासवर्ड पुन्हा टाका. तसेच कॅप्चा टाकून लॉग-इन म्हणा. त्यानंतर ‘Details’चे पेज उघडेल. त्याठिकाणच्या पर्यायावरील ‘ ७/१२ mutations’वर क्लिक करा.

8) ‘User is Citizen’ आणि बँकेचे कर्मचारी असल्यास ‘User is Bank’वर क्लिक करा. एकदा यूझरचा प्रकार निवडल्यावर ‘Process’वर क्लिक करा, ‘फेरफार अर्ज प्रणाली ई-हक्क’चे पेज ओपन होईल. तेथील माहिती भरल्यावर ‘तलाठ्यांकडे ज्या फेरफारसाठी अर्ज करायचा तो वारस नोंद पर्याय निवडा. त्यानंतर वारस फेरफार अर्ज उघडेल.

9) सुरवातीला अर्जदाराची माहिती भरून ‘पुढे जा’वर क्लिक करा. त्यानंतर स्क्रीनवर अर्ज मसुदा जतन केल्याचा मेसेज येईल आणि त्यासमोर अर्ज क्रमांक असेल. मेसेजखालील ‘ओके’ बटनावर क्लिक केल्यानंतर मृताचे नाव किंवा खाते क्रमांक टाका, सातबारावरील खाते क्रमांक टाका. पुढे ‘खातेदार शोधा’वर क्लिक करून मृताचे नाव निवडा.

10) त्यानंतर संबंधित खातेदाराचा गट क्रमांक निवडून मृत्यू दिनांक टाका. त्यानंतर ‘समाविष्ट करा’वर क्लिक करून खातेधारकाच्या जमिनीची माहिती तेथे दिसेल. त्यानंतर अर्जदार हा वारसांपैकी आहे का? असा प्रश्न येईल. होय, नाहीपैकी योग्य पर्याय निवडून ‘वारसांची नावे भरा’वर क्लिक करा.

11) वारस म्हणून ज्यांची नावे लावायची आहेत, त्यांची माहिती भरा. त्यानंतर इंग्रजीत नाव लिहा आणि मग जन्मतारीख टाका. वय टाकल्यानंतर पुढे मोबाईल नंबर आणि पिनकोड टाका. पुढील माहिती भरून पोस्ट ऑफिस निवडा. त्यानंतर पुढील माहिती भरा.

12) पुढे मृतासोबतचे नाते निवडा व शेवटी ‘साठवा’ (सेव्ह) या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर दुसऱ्या वारसाचे नाव नोंदवायचे असल्यास तेथील ‘पुढील वारस’वर क्लिक करा आणि पूर्वीप्रमाणेच माहिती भरा व ‘साठवा’वर क्लिक करा.

13) वारसांची नावे भरल्यावर ‘पुढे जा’वर क्लिक करा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा. मृत्यू दाखल्याची सत्यप्रत अपलोड करा. तसेच इतर कागदपत्रांमध्ये रेशनकार्ड जोडू शकता. मृत व्यक्तीच्या जमिनीचे ‘८-अ’चे उतारेही लागतील.

error: Content is protected !!