Land Record : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! 7/12 उतारा दुरुस्त करण्यासाठी ऑनलाइन अर्ज सुरु, कशी असेल प्रक्रिया? जाणून घ्या..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Land Record : सातबारा उतारा हा शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचा मानला जातो. कारण की शेतकऱ्याच्या नावावर किती जमीन आहे हे सातबारा उताऱ्यावरून समजत असते. त्यामुळे याला खूप महत्व आहे. शेतकऱ्यांना शेतीसंबंधित कोणतीही कामे करायची असतील तर सातबारा हा लागतोच. दरम्यान आता सातबाऱ्याबाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने सातबारा उतारा आणि प्रॉपर्टी कार्ड संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा

सातबारा उतारा आणि प्रॉपर्टी कार्ड ही दोन्हीही कागदपत्रे खूप महत्वाची आहेत. या कागदपत्रांवरून जमीन कोणाच्या नावावर आहे, त्याचबरोबर शेतकऱ्याच्या नावावर किती जमीन आहे. जमिनीवर कुठला बोजा आहे का, याबाबतचीसर्व माहिती मिळते. त्यामुळे हे कागदपत्र अतिशय महत्वाचे आहे. हे कागदपत्र जर आपल्याकडे नसेल तर आपल्याला सरकारी कामे करताना खूप अडचण येते. काही वेळेस ही कागदपत्रे नसतील तर सरकारी कामे देखील होत नाहीत. सातबारा उतारा काढणे, जमिनीचा नकाशा डाउनलोड करणे तसेच जमेनीची मोजणी याकरता आता तुम्ही Hello Krushi मोबाईल अँपचा वापर करू शकता. गुगल प्ले स्टोवरून हे अँप डाउनलोड केल्यानंतर तुम्ही सरकारच्या योजनांचे लाभार्थी बनू शकता.

बऱ्याचदा अनेकांच्या कागदपत्रांमध्ये चुका होतात. यामुळे या कागदपत्रांमधील चुका दुरुस्थ कराव्या लागतात. बऱ्याचदा असे काही शेतकरी असतात जे या चुकांकडे लक्ष देत नाहीत. मात्र या छोट्या चुकांचे भविष्यात मोठे गंभीर परिणाम भोगावे लागतात. यामुळे वेळोवेळी या चुका दुरुस्त करणे खूप गरजेचे असते. (Land Record)

या चुका दुरुस्त करण्यासाठी आतापर्यंत महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1967 च्या कलम 155 अन्वये तहसीलदार अथवा उपअधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागत असे. यानंतर शेतकऱ्यांना तहसीलदार किंवा उपअधीक्षक ऑफिसच्या अनेक चक्रा माराव्या लागतात. यामुळे शेतकऱ्याचा वेळ देखील व्हायला जातो.

चुका दुरुस्त करण्यासाठी करता येणार ऑनलाईन अर्ज –

शेतकऱ्यांना या चुका दुरुस्त करण्यासाठी ऑफलाईन पद्धतीने अधिकाऱ्यांच्या मागे फिरावे लागते त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात पिळवणूक देखील केली जाते. मात्र आता शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आता सातबारा उतारा आणि प्रॉपर्टी कार्ड मधील चुका दुरुस्त करण्यासाठी केला जाणारा अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करता येणार आहे. यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

असा करा अर्ज?

तुम्हाला जर तुमच्या सातबारा उतारा आणि प्रॉपर्टी कार्ड मधील चुका दुरुस्थ करायच्या असतील तर तुम्ही आजच गुगल प्ले स्टोअरवरून Hello Krushi हे अँप इन्स्टॉल करून घ्या. या अँपच्या मदतीने तुम्ही कोणत्याही सरकारी योजनेला अर्ज करू शकता. तसेच तुम्ही महा-ई-सेवा केंद्राद्वारे ऑनलाईन अर्ज सादर करू शकता. ही ऑनलाईन अर्जाची सुविधा १ ऑगस्ट २०२३ पासून सुरू झाली आहे.

वेळेची होणार बचत –

सातबारा उतारा आणि प्रॉपर्टी कार्ड मधील दुरुस्ती ऑनलाईन करण्यात येत असल्यामुळे नागरिकांची सर्व कामे वेळेत होणार आहेय. त्याचबरोबर वेळ देखील वाचणार आहे. त्यामुळे आता सातबारा उतारा आणि प्रॉपर्टी कार्ड मधील चुका दुरुस्त करण्यासाठी नागरिकांना कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये फेरे घालावे लागणार नाहीत.

error: Content is protected !!