Land Records : जमिनीची सर्व जुनी कागदपत्रे एका क्लिकवर; पहा… कसे मिळवाल!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात बरेच शेतकरी जमीन खरेदी करत, लाखो रुपयांचा व्यवहार करतात. मात्र अशी जमीन खरेदी केलेले कागदपत्र (Land Records) हरवल्यास शेतकऱ्यांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागते. कधी-कधी तर जमीन खरेदी केल्याचे कागदपत्रच नसल्याने, अशा जमिनीसाठी शेतकऱ्यांना न्यायालयात खेटे मारावे लागतात. त्यासाठी शेतकऱ्यांना खरेदी केलेली जमीन नेमकी कोणाची होती? त्या जमिनीच्या कागदपत्रांमध्ये वेळोवेळी काय-काय बदल होत गेले. अशी माहिती असणे खूप गरजेचे असते. याचसाठी राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व जमिनीच्या जुन्या कागदपत्रांचे (Land Records) संगणकीकरण करण्यात आले आहे.

सर्व कागदपत्रे एका क्लिकवर (Land Records In One Click)

शेतकऱ्यांना खरेदी केलेल्या संबंधित जमिनीचे फेरफार, सातबारा आणि खाते उतारे आदी यांसारखी जुनी कागदपत्रे मिळवण्यासाठी भूमिअभिलेख कार्यालयात वारंवार चकरा माराव्या लागतात. आणि विशेष म्हणजे चकरा मारूनही शेतकऱ्यांना ही कागदपत्रे वेळेत मिळतील, याची शाश्वती नसते. शेतकऱ्यांची हीच अडचण लक्षात घेऊन, राज्य सरकारच्या भूमिअभिलेख विभागाकडून राज्यातील सर्व जमिनींची जुनी कागदपत्रे शेतकऱ्यांना विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यासाठीचे राज्यातील मुंबई शहर वगळता उर्वरित, 35 जिल्ह्यांतील सर्व तहसिल, भूमी अभिलेख आणि नगर भूमापन कार्यालयातील जुन्या अभिलेखांचे स्कॅनिंग करण्याचे कामकाज अंतिम टप्प्यात आले आहे.

22 जिल्ह्यातील स्कॅनिंग पूर्ण

सध्याच्या घडीला 22 जिल्ह्यातील जमिनींच्या जुन्या कागदपत्रांचे (Land Records) स्कॅनिंग पूर्ण झाले असून, ते भूमिअभिलेख विभागाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. या जुन्या कागदपत्रांमध्ये राज्यातील जमिनींचे जुने सातबारा उतारे, जुनी फेरफार नोंदवही, चालू खाते उतारे, टिपण, आकारबंद, योजना पत्रक, क.जा.प., आकारफोड, जुन्या मिळकत पत्रिका, चौकशी नोंदवही या असांक्षाकित अभिलेखांचा समावेश आहे. ही सर्व कागदपत्रे भूमी अभिलेख विभागाच्या संकेतस्थळावर केवळ पाहण्यासाठी उपलब्ध असून, याद्वारे राज्यातील शेतकरी व नागरिकांना मोठी मदत होणार असल्याचे प्रभारी अप्पर जमाबंदी आयुक्त आणि अतिरिक्त संचालक सरिता नरके यांनी म्हटले आहे.

कसे मिळवाल जुने फेरफार, सातबारा उतारे?

  • सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi असे सर्च करुन Hello Krushi App डाऊनलोड करा.
  • हे Hello Krushi App तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल केल्यानंतर, तुम्हाला विचारलेली सर्व माहिती भरा.
  • त्यानंतर या Hello Krushi App अँपमध्ये होम पेजवर तुम्हाला ‘सातबारा व भू-नकाशा’ नावाचा विभाग दिसेल त्यावर क्लिक करा.
  • त्यानंतर त्यात असलेल्या “भूमी अभिलेख” (Land Records) विभागावर क्लिक करा. त्या ठिकाणी Aaple Abhilekh पोर्टल ओपन होईल.
  • या Aaple Abhilekh पोर्टलवर, तुमची वैयक्तिक माहिती, घरचा पत्ता आणि लॉगिनची माहिती देऊन Registration करून Login करा.
  • एकदा तुम्ही लॉग इन केल्यानंतर, “फेरफार उतारा” हा पर्याय निवडा.
  • तुमच्या गट क्रमांक टाकून “सर्च” वर क्लिक करा.
  • त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या गट क्रमांकाशी संबंधित फेरफाराची माहिती दिसेल.
  • फेरफाराचे वर्षं आणि क्रमांक तिथे दिलेला असतो. तुम्ही त्यावर क्लिक करून संबंधित वर्षाचा फेरफार पाहू शकता.
  • तुम्हाला ज्या वर्षाचा फेरफार पाहायचा आहे. त्याच्या समोरील “कार्टमध्ये ठेवा” या पर्यायावर क्लिक करा.
  • “कार्टमध्ये ठेवा” वर क्लिक केल्यानंतर, तुमच्या स्क्रीनवर “Cart” चे पेज ओपन होईल.
  • “Cart” मध्ये, तुम्ही तुमच्या निवडलेल्या फेरफाराची माहिती पाहू शकता.
  • “Download Available Files” वर क्लिक करून तुम्ही तुमचा निवडलेला फेरफार डाउनलोड करू शकता.
  • अशाच पद्धतीने तुम्ही सर्व जुनी कागदपत्रे पाहू शकतात.
error: Content is protected !!