Sunday, October 1, 2023
Hello Krushi
Download FREE APP
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Hello Krushi
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ

Land Records : शेतजमिनीवर घर बांधले असेल तर पाडावं लागू शकतं? ‘हा’ नियम तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या

Tushar More by Tushar More
July 29, 2023
in विशेष लेख, GR, बातम्या
Land Records
WhatsAppFacebookTwitter

Land Records : बऱ्याचदा घर बांधण्यासाठी पुरेशी जमीन नसल्याने लोक शेतात घरे बांधतात. तुम्ही देखील असाच घर बांधण्याचा विचार करत असाल तर ही माहिती एकदा वाचाच. नाहीतर घर बांधल्यानंतर ते पाडावे लागेल, असे होऊ नये म्हणून ही माहिती एकदा वाचा. अनेक गोष्टींचे नियम असतात. तसाच शेतजमिनीशी संबंधित देखील एक नियम आहे जो तुम्हाला आवश्यक प्रक्रियेशिवाय शेतजमिनीवर घर बांधण्याची परवानगी देत ​​नाही. याशिवाय बरेच जण शेतजमिनीवर प्लॉट बनवून त्यांची विक्री करतात. अशी जमीन खरेदी करूनही तुमचे पैसे बुडू शकतात. त्यामुळे पैसे गमावण्यापूर्वी, त्याच्याशी संबंधित नियम समजून घ्या.

Table of Contents

  • जमीन मोजणी २ मिनिटांत मोबाइलवरुन करण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा
    • जमीन मोजणी, सातबारा उतारा, भूनकाशा हे सर्व मोबाईलवरून २ मिनिटांत करा
    • शेतजमिनीवर घर बांधण्यासाठी काय करावे?
    • जमिनीचे रूपांतरण नेमके कसे केले जाते? (How to convert agricultural land into na plot in Maharashtra?)
    • शासनाचा नवीन GR काय म्हणतो?
    • जमीन NA करण्यासाठी काय प्रक्रिया आहे? (How to convert agricultural land into na plot in Maharashtra?)

जमीन मोजणी २ मिनिटांत मोबाइलवरुन करण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा

ज्या जमिनीवर सर्व पिके घेतली जातात ती जमीन लागवडीखाली येते. सामान्यत: शेतजमीन क्षेत्राचा एक भाग म्हणून परिभाषित केलेली, जमीन कायमस्वरूपी कुरणे, पिके आणि कृषी क्रियाकलाप इत्यादींसाठी वापरली जाते. यामध्ये शेतकऱ्यांकडून दरवर्षी पिके घेतली जातात. या जमिनीवर तुमचा मालकी हक्क असूनही तुम्ही त्यावर घर बांधू शकत नाही. त्यासाठी सरकारची परवानगी घ्यावी लागेल. Land Records

जमीन मोजणी, सातबारा उतारा, भूनकाशा हे सर्व मोबाईलवरून २ मिनिटांत करा

आता जमीन मोजणी असो किंवा तुम्हाला तुमचा सातबारा उतारा, भूनकाशा काढायचा असो. तुम्ही तुमच्या मोबाईलवरून अगदी सहज २ मिनिटांत या बाबी करू शकता. यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi नावाचे मोबाईल अँप डाउनलोड करून घ्यावे लागेल. हे अँप शेतकऱ्यांसाठी खूप जास्त महत्वाचे आहे. यामध्ये आपल्याला कोणत्याही सरकारी योजनांना अर्ज करता येतो. सोबत रोजचे बाजारभाव, हवामान अंदाज या सर्व बाबी इथे समजतात. तेव्हा आजच गुगल प्ले स्टोअरवरून Hello Krushi हे मोबाईल अँप डाउनलोड करून घ्या.

शेतजमिनीवर घर बांधण्यासाठी काय करावे?

जर तुम्हाला शेतजमिनीवर घर बांधायचे असेल तर आधी त्या जमिनीचे रूपांतर NA मध्ये म्हणजेच Non Agriculture Land करून घ्यावे लागेल. तुम्हाला त्यासाठी काही शुल्क देखील द्यावे लागते. याशिवाय तुम्हाला नगर परिषद किंवा ग्रामपंचायतीकडून एनओसी घेणे आवश्यक आहे. असे केल्यास तुम्हाला फायदा होईल आणि भविष्यात होणारे नुकसान टाळता येईल.

जमिनीचे रूपांतरण नेमके कसे केले जाते? (How to convert agricultural land into na plot in Maharashtra?)

शेतजमिनीचे निवासी जमिनीत रूपांतर करण्यासाठी तुम्हाला रूपांतरण करावे लागेल, त्यासाठी काही महत्त्वाची कागदपत्रे आवश्यक आहेत. जमीन मालकाचे ओळखपत्र, त्याचबरोबर पिकांची नोंद, भाडेकरू,आणि मालकी हक्काची नोंद इत्यादी गोष्टी असणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर तुम्हाला जमीन वापराचा आराखडा, सर्वेक्षण नकाशा, जमीन महसूलाच्या पावत्या देखील विचारल्या जातात. याशिवाय त्या जमिनीवर कोणतीही थकबाकी किंवा कोणताही खटला चालवू नये. असे केल्यास जमिनीचे रूपांतरण होईल आणि तुम्हाला घर बांधण्यास कोणतीही अडचण येणार नाही.

शासनाचा नवीन GR काय म्हणतो?

महाराष्ट्र सरकारने २३ मे २०२३ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयाद्वारे बिल्डिंग प्लॅन मॅनेजमेंट सिस्टम (BPMS) सुरू केली आहे. बिगर कृषी वापर प्रमाणपत्रे आणि बांधकाम/विकास परवानग्या जारी करण्यासाठी सरकारने हि नवीन प्रणाली सुरु केली आहे. महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड, 1966 (कोड) नुसार, (i) शेतजमीन नॉन अग्रीकल्चर कारणांसाठी वापरण्यासाठी किंवा (ii) सदर जमिनीच्या वापरामध्ये विशिष्ट बदल करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची पूर्व परवानगी आवश्यक आहे.

वास्तविक औद्योगिक वापर किंवा टाउनशिप प्रकल्पांसारख्या प्रोजेक्टकरता जर शेतजमीन नगर नियोजन योजनेच्या औद्योगिक क्षेत्रात स्थित असेल तर महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगररचना अधिनियम, 1966 (MRTP कायदा) किंवा इतर कोणत्याही लागू कायद्यांतर्गत खालील अटींच्या पूर्तता करणे गरजेचे आहे

(i) ज्या व्यक्तीला अशी शेतजमीन गृहप्रकल्पसाठी वापरायची आहे त्याच्याकडे सदर जमिनीचा ताबा असावा तसेच टायटल क्लिअर असावे.
(ii) जमीन किंवा तिचा कोणताही भाग कोणत्याही सार्वजनिक प्रकल्पासाठी राखीव नसावा.

जमीन NA करण्यासाठी काय प्रक्रिया आहे? (How to convert agricultural land into na plot in Maharashtra?)

Step 1: तुम्ही याकरता जिल्हाधिकारी यांना अर्ज करू शकता
Step 2: यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तुमच्या जमिनीचे व्हेरिफिकेशन केले जाते.
Step 3: व्हेरिफिकेशन प्रक्रिया तहसीलदार करतात.
Step 4: यानंतर तुमची जमीन आणि त्यासाठीचे नियम तपासले गेल्यानंतर तुमची जमीन NA प्लॉट म्हणून वापरण्यास परवानगी देणेबाबत आदेश काढला जातो.
Step 5: यानंतर महसूल विभागात याबाबत नोंद केली जाते. Entries in the Revenue Records.

Tags: Land MeasurementLand RecordsNA plotRevenue Recordsशेतजमिन नियम
SendShareTweet

ताज्या बातम्या

Weather Update

Weather Update : राज्यात ‘या’ भागात पाऊस सक्रिय राहणार; हवामान विभागाचा अंदाज

September 29, 2023
India drought 2023

देशात दुष्काळाचे सावट? 718 पैकी 500 हून अधिक जिल्हे दुष्काळी स्थितीत

September 29, 2023
Dr Swaminathan

Dr Swaminathan : हरितक्रांतीचे जनक डॉ. स्वामीनाथन यांचे निधन

September 29, 2023
Havaman Andaj

Havaman Andaj : गणेशविसर्जनाला मुसळधार पाऊस? पुढील 24 तासात जोरदार पावसाची शक्यता; तुमच्या गावात पाऊस पडणार?

September 28, 2023
Weather Update

Weather Update : राज्यातील ‘या’ भागात विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पावसाची शक्यता; पहा तुमच्या जिल्ह्यात कसं असेल वातावरण?

September 27, 2023
Government Contractor

Government Contractor : सरकारी ठेकेदार होण्यासाठी कशी असते परवाना प्रक्रिया? या ठिकाणी करावा लागेल अर्ज? जाणून घ्या सविस्तर माहिती

September 26, 2023
  • Privacy Policy
  • Contact us

Website Powerd by Hello Media Group.
Maintained by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ

Website Powerd by Hello Media Group.
Maintained by ContentOcean Infotech Private Limited.

error: Content is protected !!
Join WhatsApp Group