Lasun Rate : कांद्याला 200 रुपये क्विंटल तर लसणाला 200 रुपये किलो भाव; शेतकरी त्रस्त!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : कांदा दर घसरणीमुळे राज्यातील शेतकरी त्रस्त आहेत. मात्र, अशातच आता लसूण (Lasun Rate) उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळत आहे. ज्यामुळे सध्या विपरीत परिस्थिती पाहायला मिळत आहे. अर्थात कांद्याला 200 रुपये क्विंटलचा भाव मिळत असताना लसणाला मात्र घाऊक बाजारात 200 रुपये प्रति किलो अर्थात 20 हजार रुपये प्रति क्विंटल ते 50 हजार रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत आहे. मागील वर्षी लसूण उत्पादक शेतकऱ्यांना या कालावधीत केवळ 10 ते 20 रुपये प्रति किलोचा दर मिळत होता. ज्यामुळे सध्या एक किलो लसूण (Lasun Rate) एक क्विंटल कांद्याच्या बरोबरीने असल्याचे दिसून येत आहे.

14000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर (Lasun Rate Today 29 March 2024)

देशात प्रामुख्याने मध्य प्रदेश हे राज्य लसूण उत्पादनात आघाडीवरील राज्य आहे. याशिवाय राजस्थान, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्येही लसूण लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. दोन महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांना घाऊक बाजारात 300 ते 400 रुपये किलो दराने लसूण (Lasun Rate) विकला जात होता. तर किरकोळ बाजारामध्ये लसणाचे दर 500 रुपये किलो दराने मिळत होता. महाराष्ट्रातील सोलापूर व मुंबई बाजार समितीत सध्या लसणाला 14000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर मिळत आहे. कांदा उत्पादकांना दर मिळत नसताना लसूण दराने शेतकऱ्यांना संपूर्ण हंगामात तारल्याचे पाहायला मिळत आहे.

आले पिकालाही मिळतोय चांगला दर

सध्याच्या घडीला शेतकऱ्यांना बाजारात हायब्रीड लसणासाठी अधिकचा दर मिळत आहे, तर स्थानिक लसणाच्या वाणासाठी कमी भाव मिळत आहे. राज्यातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये कांदा आणि सोयाबीनचे भाव अत्यंत कमी आहेत. तर लसणाचा भाव (Lasun Rate) गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्तम पातळीवर आहे. कारण यंदा लसूण लागवड कमी झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मागील वर्षी दर कमी असल्याने लसूण उत्पादक शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागला होता. तसेच मागील वर्षी आले उत्पादक शेतकऱ्यांना देखील अतिशय कमी भाव मिळाला होता. मात्र यावर्षी आले पिकाला देखील चांगला भाव मिळत आहे. राज्यातील बाजार समित्यांमध्ये सध्या आल्याला 46,000 रुपये प्रति क्विंटल, तर ताज्या आल्याला 12,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर मिळत आहे.

error: Content is protected !!