Lemon Farming : कागदी लिंबू लागवड, शेतकऱ्यांसाठी उत्तम पीक; 12 वर्ष मिळते उत्पादन!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : लिंबाचे भाव उन्हाळयात गगनाला भिडलेले असतात. लिंबाचे (Lemon Farming) अनेक फायदे देखील असून, आयुर्वेदिक आणि आरोग्याबाबत वाढत्या जागरुकतेमुळे लिंबाचा वापर वाढला आहे. तुम्हीही पारंपरिक पिकांऐवजी अन्य पिकांचे उत्पादन घेण्याचा विचार करत असाल तर कागदी लिंबाची लागवड हा अधिक नफा मिळवण्याच्या दृष्टीने तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. कागदी लिंबाची लागवड (Lemon Farming) करुन तुम्ही चांगला नफा मिळवू शकतात.

लिंबू पिकाची लागवड (Lemon Farming) केल्यास, इतर फळबागांच्या तुलनेत ते अतिशय फायदेशीर ठरू शकते. वर्षभर बाजारात लिंबाला मागणी असते आणि त्याला दरही चांगला मिळतो. उन्हाळ्यामध्ये तर अक्षरशः पाच रुपयाला एक याप्रमाणे लिंबू विक्री होते. लिंबाची लागवड कमी प्रमाणात होत असल्याने अजून तरी लिंबाच्या दरात शेतकऱ्यांना रस्तावर टाकण्याइतपत दर खाली आल्याचे ऐकण्यात नाही. त्यामुळे अन्य पिकांना कमी दर मिळत असताना शेतकरी कागदी लिंबू लागवडीतून नक्कीच अधिकचा नफा मिळवू शकतात.

किती रुपयांना मिळते रोपे? (Lemon Farming 12 Years Of Production)

अलीकडच्या काळाज कागदी लिंबाच्या लागवडीत वाढ होत आहे. कागदी लिंबाचे एक रोप सुमारे 200 रुपयांना मिळते. विशेष म्हणजे हे लिंबाचे एक झाड सलग 12 वर्षे फळ देते. एवढेच नाही तर लिंबाच्या या जातीमध्ये सामान्यपेक्षा जास्त फळे येतात. एका झाडाला 3 हजार ते 5 हजार लिंबू येतात. यातून शेतकऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो. कागदी लिंबाच्या लागवडीनंतर सुरुवातीला उत्पादन कमी होते. लिंबू या पिकाला लागवडीपासून तीसऱ्या वर्षापासून फळधारणा व्हायला सुरुवात होते. त्यानंतर हळूहळू उत्पादन वाढत जाते. त्यानंतर शेतकरी लिंबू लागवडीतून दरमहा दीड लाख रुपयांपर्यंत नफा मिळवू शकतात.

तीनही बहरात उत्पादन

कागदी लिंबाची लागवड केल्यानंतर सुरुवातीला त्याची योग्य काळजी घ्यावी. कारण चांगली काळजी घेतल्यावर उत्पादनही चांगले होऊ शकते. कागदी लिंबाचे वर्षातून तीन वेळा तीनही बहरात उत्पादन मिळते. यामध्ये एकावेळी 15 हजार ते 20 हजार लिंबू सहज काढता येतात. घाऊक बाजारात दर कितीही कमी असेल तरी एक लिंबू किमान तीन रुपयांना तरी विकले जाते.

पिकाची काळजी महत्वाची

लिंबू पिकाचे नुकसान टाळण्यासाठी कीटक आणि रोगांकडे विशेष लक्ष द्यावे. लिंबू पिकावर अनेक प्रकारच्या कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. जे वेळेवर ओळखणे आवश्यक असते. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसू शकतो. तसेच लिंबू पिकास योग्य वेळी खत-पाणी देणे गरजेचे असते. लिंबू या फळझाडाला डिंक या नावाचा रोग होतो डिंक्या लागल्यानंतर संपूर्ण झाड वाळून जातील, त्यामुळे झाडाच्या खोडाला चुना आणि गेरू लावला जातो जेणेकरून झाडाच्या खोडाला कसलीही इजा होणार नाही. त्यामुळे रोगाबाबत लिंबू पिकाची विशेष काळजी घ्यावी लागते.

error: Content is protected !!