Lemon Farming : नोकरी सोडली, 2 एकरात लिंबू लागवड; मिळवतायेत वार्षिक 7 लाखांचा नफा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात अनेक शेतकरी सध्या लिंबू लागवडीकडे (Lemon Farming) वळत आहे. विशेष म्हणजे बाजारात लिंबूला नेहमीच मागणी असते. इतकेच नाही तर बाजारात उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये लिंबूची मागणी वाढल्यानंतर, एक लिंबू या 5 ते 10 रुपयांना मिळत असल्याचे आपण दरवर्षीच अनुभवतो. मात्र, आता बहुराष्ट्रीय कंपनीतील नोकरी सोडून, एका शेतकऱ्याने लिंबू शेती यशस्वी करून दाखवली आहे. विशेष म्हणजे हा शेतकरी गेले 8 वर्ष लिंबू शेती करत आहे. त्यांच्या लिंबू शेतीतील (Lemon Farming) योगदानाबद्दल सध्या त्यांनी ‘लेमन मॅन’ म्हणून आपली सर्वीकडे ओळख निर्माण केली आहे.

2016 मध्ये सोडली नोकरी (Lemon Farming Annual Profit of 7 Lakhs)

आनंद मिश्रा असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते उत्तर प्रदेशातील रायबरेली जिल्ह्यातील कचनावा गावातील रहिवासी आहे. आनंद मिश्रा हे 2002 पासून एका फर्निचर कंपनीत मोठ्या पदावर काम करत होते. त्यांना पगारही उत्तम मिळत होता. मात्र, अशातच त्यांना शेतीची आवड निर्माण झाली. त्यातूनच त्यांनी 2016 मध्ये आपली नोकरी सोडली. आणि शेतीची वाट धरली. नोकरी सोडल्यानंतर लिंबू या पिकाला बाजारात नेहमीच उत्तम दर मिळतो. हे लक्षात घेऊन त्यांनी लिंबू लागवड (Lemon Farming) करण्याचा निर्धार मनी पक्का केला.

किती मिळतंय उत्पन्न?

शेतकरी आनंद मिश्रा यांनी आपल्या दोन एकर शेतात 400 हून अधिक लिंबाची रोपे लावली आहेत. त्यांनी आपल्या बागेमध्ये लिंबाच्या एकूण सात जातींची लागवड केली आहे. ज्यामध्ये बियाविरहित थाई लिंबू, NRCC-8, प्रमालिनी आणि काग्झी रास्पबेरी जातींची त्यांनी लागवड केली आहे. लिंबाची लागवड करताना त्यांनी एका रोपापासून दुसऱ्या रोपापर्यंत 10×20 फूट अंतर ठेवले आहे. त्यांना जवळपास 2017 पासून उत्पन्न मिळण्यास सुरुवात झाली असून, त्यांना लिंबाच्या एक झाडापासून दोनदा फळ मिळत आहे. एका झाडापासून त्यांना वार्षिक 3,000 ते 4,000 रुपये मिळत आहे. अर्थात त्यांना दोन एकर बागेतून वार्षिक 7 लाख रुपयांपर्यंतचा निव्वळ उत्पन्न मिळत आहे.

थेट बांधावरून होते खरेदी

लिंबू लागवड केल्यानंतर त्या झाडांपासून 25 वर्षांपर्यंत उत्पादन मिळत राहते. याशिवाय लिंबूचे झाड वर्षातून दोनदा फळ देते. मिश्रा यांनी आपल्या बागेत थाई प्रकारच्या लिंबूची अधिक झाडे लावली आहेत. या प्रकारच्या फळांमध्ये बिया नसतात आणि भरपूर रस असतो. व्यापारी आनंद मिश्रा यांच्या शेताच्या बांधावरून थेट लिंबू खरेदी करतात. शेतातूनच 40 रुपये किलो दराने लिंबू विकला जातो. दोन एकरांवर लिंबू लागवड करण्यासाठी एक लाख रुपये खर्च करून, त्यांना आता वार्षिक 7 लाख रुपये उत्पन्न सहज मिळत असल्याचे ते सांगतात.

error: Content is protected !!