Lemon Market Rate : लिंबाच्या दरात मोठी वाढ; वाचा.. एक लिंबूला किती मिळतोय भाव!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : उन्हाळयाच्या दिवसांमध्ये लिंबाचे दर (Lemon Market Rate) वाढणे हे शेतकऱ्यांसाठी नवीन नाही. उन्हाळयात मागणी वाढताच लिंबाचे दर गगनाला भिडतात. हे ठरलेले सूत्र आहे. मात्र अशातच सध्या लिंबाचे दर 350 टक्क्यांनी अधिक वाढल्याचे पाहायला मिळत आहे. देशातील लिंबू उत्पादक भागांमध्ये यंदा मुबलक प्रमाणात उत्पादन न झाल्याने, बाजारात सध्या लिंबाचा तुटवडा जाणवत आहे. ज्यामुळे सध्या लिंबाचे दर गगनाला भिडले आहेत. शेतकऱ्यांकडे बाजारातील मागणी पूर्ण होईल, इतक्या क्षमतेत लिंबू उपलब्ध नाही. ज्यामुळे सध्या लिंबू दरवाढीला (Lemon Market Rate) बळ मिळाले आहे.

7,000 रुपयांचा उच्चांकी दर (Lemon Market Rate)

गेल्या तीस वर्षांपासून लिंबू विक्रीच्या व्यवसायात असलेल्या अकबर हुसैन या विक्रेत्याने म्हटले आहे की महिनाभरापूर्वी मोठ्या आकाराच्या प्रति 1000 लिंबूला घाऊक बाजारात 2,000 रुपये दर मिळत होता. मात्र, सध्या घाऊक बाजारात त्याच आकाराच्या प्रति 1000 लिंबूला 7,000 रुपये इतका उच्चांकी दर मिळत आहे. अर्थात मागील महिनाभरात लिंबू दरात जवळपास 350 टक्क्यांनी अधिक वाढ नोंदवली गेली आहे.

एक लिंबू 5 ते 10 रुपयांना

उन्हाची तीव्रता वाढल्याने लिंबू सोडा आणि कोल्ड ड्रिंकसाठी लिंबूची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. लिंबू व्यापारातील जाणकारांच्या म्हणण्यानुसार मार्चअखेर ही परिस्थिती असताना आणखी दोन महिन्यात लिंबाचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. सध्याच्या घडीला बाजारात मध्यम आकाराचा एक लिंबू 5 रुपये तर मोठ्या आकाराचा लिंबू 7 ते 10 रुपये दराने विक्री होत आहे. मॉन्सूनोत्तर आणि अवकाळी पावसाचा फटका लिंबू पिकाच्या हस्त बहाराला बसला. ज्यामुळे योग्य त्या प्रमाणात फूल आणि फळधारणा झाली नाही. परिणामी बाजारात लिंबाची आवकच मंदावली आहे. ज्यामुळे सध्या दरवाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.

दुष्काळी स्थितीमुळे शेतकरी अडचणीत

आंध्र प्रदेश लिंबू उत्पादनाच्या बाबतीत भारतातील सर्व राज्यांमध्ये आघाडीवर आहे. त्या पाठोपाठ गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि ओडिसा या राज्यांचा क्रमांक लागतो. मात्र, यंदा कर्नाटकसह अनेक महत्वाच्या राज्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती असल्याने लिंबू उत्पादनावर त्याचा परिणाम झाला आहे. सध्याच्या घडीला पाण्याच्या कमतरतेमुळे अनेक राज्यांमध्ये लिंबूची बाग जगवून ठेवणे, शेतकऱ्यांसाठी अवघड झाले आहे.

error: Content is protected !!