Lemon Market Rate : लिंबाच्या दरात मोठी वाढ; मागणीत वाढ झाल्याने एक लिंबू मिळतोय 10 रुपयांना!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मे महिनाच्या सुरवातीला राज्यात प्रचंड उकाडा (Lemon Market Rate) जाणवत असून, दुपारच्या सुमारास घराबाहेर पडणे देखील मुश्किल झाले आहे. ज्यामुळे सध्या बाजारात लिंबाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी, सध्या लिंबांच्या दरात वाढ झाली असून, लिंबू प्रतिकिलो 200 ते 250 रुपयांवर पोहोचला आहे. तर एका लिंबासाठी दहा रुपये मोजावे लागत आहेत. एका किलोत आकारानुसार साधारण वीस ते तीस लिंबू येतात. ज्यामुळे सध्या लिंबू उत्पादकांना (Lemon Market Rate) चांगले दिवस आल्याचे पाहायला मिळत आहे.

उन्हाळा संपेपर्यंत दर चढेच (Lemon Market Rate Today 7 May 2024)

प्रामुख्याने हिवाळ्यात लिंबाचे दर नियंत्रणात होते. मात्र, तापमानात जसजशी वाढ होत आहे. तसतशी लिंबांच्या भावातही (Lemon Market Rate) वाढ होत आहे. पाच रुपयाला मिळणारा एक लिंबू दहा रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. तर प्रति किलो 200 रुपयांवर लिंबाचे भाव पोहोचले आहेत. घाऊक लिंबू घेणाऱ्यांना दर कमी करून दिले जातात. मात्र, एक किंवा दोन लिंबू घेणाऱ्यांना प्रति नग दहा रुपयाने विकत घ्यावा लागत आहे. उन्हाळा संपेपर्यंत लिंबूचे दर असेच चढे राहतील, अशी शक्यता लिंबू व्यावसायिकांकडून व्यक्त केली जात आहे. कोल्हापूर, बेळगाव आदी बाजारांतून राज्यात लिंबाची आवक होत असते.

यंदा मॉन्सूनोत्तर आणि अवकाळी पावसाचा फटका हस्त बहाराला बसला. अपेक्षित फूल आणि फळधारणा झाली नाही. परिणामी सध्या बाजारात लिंबाची आवकच मंदावली आहे. त्यातुलनेत उष्णतेमुळे आवक मात्र मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे लिंबाचे भाव प्रति किलो 200 रुपयांवर पोहोचले आहेत. असे लिंबू बाजारातील जाणकारांकडून सांगितले जात आहे.

लिंबूपाणी पिणे फायदेशीर

दरम्यान, लिंबामध्ये व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह असते. त्यामुळे सौंदर्य आणि आरोग्य दोन्हींसाठी लिंबाचा वापर गुणकारी ठरतो. उन्हाळ्यात भूक कमी लागते. त्यामुळे सतत अशक्तपणा, थकवा जाणवतो. मात्र, उन्हाळ्यात ताजेतवाने राहण्यासाठी आणि उष्माघात टाळण्यासाठी लिंबूपाणी पिणे फायदेशीर असते. ज्यामुळे लिंबाच्या मागणीत उन्हाळ्यात वाढ होऊन, दरात वाढ झालेली पाहायला मिळते.

error: Content is protected !!