Lemon State Fruit : ‘या’ राज्यात ‘लिंबू’ राज्य फळ घोषित; वाचा..काजी लिंबूची वैशिष्ट्ये!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रातील वातावरण लिंबू लागवडीसाठी पोषक असून, राज्यातील अनेक भागात लिंबाचे पीक (Lemon State Fruit) घेतले जाते. प्रामुख्याने सोलापूर, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, अकोला, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर या भागातील बरेच लिंबूची मोठ्या प्रमाणात लागवड करतात. मात्र अशातच आता आसाम राज्य सरकारने ‘लिंबू’ या फळाला राज्य फळाचा दर्जा (Lemon State Fruit) देण्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे आसाम सरकारने घोषित केलेल्या ‘काजी लिंबू’ या लिंबूच्या जातीला यापूर्वी भौगोलिक संकेत (जीआय) मानांकन देखील मिळाले आहे.

स्वदेशी प्रजाती (Lemon State Fruit In Assam)

ज्याप्रमाणे महाराष्ट्रात गोड आणि सुमधुर आंबा हे राज्य फळ म्हणून ओळखले जाते. त्याचप्रमाणे आता आसाममध्ये लिंबू हे फळ राज्य फळ (Lemon State Fruit) ओळखले जाणार आहे. काजी लिंबू हा आपल्या विशिष्ट स्वादासाठी आणि सुंगधासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. काजी लिंबू ही लिंबाची स्वदेशी प्रजाती असून, ही लिंबाची जात विशेषतः आसाममध्ये आढळून येते. त्या ठिकाणी शेतकरी या लिंबाची सेंद्रिय पद्धतीने मोठ्या प्रमाणात शेती करतात. लिंबू हा स्वयंपाक घरातील महत्वाचा घटक असून, उन्हाळयाच्या दिवसांमध्ये त्याचा सरबत व पेय बनवण्यासाठी मोठा वापर होतो. ज्यामुळे त्याला वर्षभर बाजारात मागणी असते.विशेष म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये एका लिंबासाठी जवळपास १० रुपये मोजावे लागतात. त्यामुळे लिंबाची शेती शेतकऱ्यांसाठी विशेष फायद्याची मानली जाते.

काजी लिंबूची वैशिष्ट्ये

काजी लिंबू ही लिंबाची जात इतर जातींपेक्षा वेगळी असते. विशेष म्हणजे या लिंबाला बिया कमी असतात. याशिवाय फळ लांब आणि आयताकृती असते. या या लिंबाच्या जातीचे वैज्ञानिक नाव सायट्रस लिमन हे आहे. या जातीच्या लिंबूला आसाममध्ये जीआय मानांकन देखील मिळाले आहे. या लिंब्याच्या जातीमध्ये साधारण गोल लिंबांपेक्षा मोठे आणि अधिक रस असतो. पिकताना हे लिंबू फळ अधिक पिवळसर दिसते. या लिंबाचे उत्पादन प्रामुख्याने दिब्रुगड, गोलाघाट, कचार, चिरांग, नलबारी आणि दिमा हासाओ या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घेतले जाते.

जागतिक ओळख मिळणार

आसाममसधील या काजी लिंबूची युरोपियन देशांसह अन्य पाश्चिमात्य देशांमध्ये मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते. हा लिंबू आपली चव आणि सुंगध यासाठी विशेष ओळख बाळगून आहे. त्यामुळे आसाम सरकारने आपल्या या प्रजातीला जागतिक पातळीवर उंची मिळवून देण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा यांनी विधानसभेत राज्य फळ म्हणून घोषणा करताना म्हटले आहे. याशिवाय राज्यातील आहाराला या लिंबूने एक वेगळीच चव निर्माण करून दिली आहे. असेही त्यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!