Lentils Cultivation : मसूर लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल; देशांतर्गत दर स्थिर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रातील अनेक शेतकरी मसूर पीक (Lentils Cultivation) घेतात. हे पीक रब्बी हंगामात प्रामुख्याने मराठवाडयातील परभणी, औरंगाबाद, नांदेड व बीड जिल्ह्यात कोरडवाहू पद्धतीने जवळपास 12 हजार हेक्टर क्षेत्रावर घेतले जाते. अशातच आता रब्बी हंगामातील देशातील प्रमुख पीक असलेल्या मसूरच्या लागवडीकडे (Lentils Cultivation) यावर्षीच्या हंगामात देशातील शेतकऱ्यांचा ओढा वाढला असल्याचे सांगितले जात आहे.

ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा या देशांमधून भारतात मोठ्या प्रमाणात मसूरची आयात केली जाते. ज्यामुळे देशांतर्गत बाजारात मसूरचा मागणी आणि पुरवठा संतुलित राहून दर स्थिर राहण्यास मदत होते. त्यातच यावर्षी केंद्र सरकारकडून मसूर या पिकासाठीच्या हमीभावात मोठी वाढ करण्यात आली आहे. परिणामी मसूरची मागणी आणि वाढलेला हमीभाव यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात या पिकाकडे वळले असल्याचे सांगितले जात आहे. मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल ही प्रमुख मसूर उत्पादक राज्य असून, या राज्यांमध्ये मसूर लागवडीखालील क्षेत्रात मोठया प्रमाणात वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेशचा सीमावर्ती भाग तसेच बुंदेलखंडचा परिसर मसूर पिकासाठी विशेष प्रसिद्ध आहे.

देशांतर्गत दर स्थिर (Lentils Cultivation In India)

देशात सध्या मसूरला घाऊक बाजारात 8397 रुपये प्रति क्विंटलच्या आसपास दर मिळत आहे. तर किरकोळ बाजारात मसूर डाळीचा दर हा 94.46 रुपये प्रति किलोच्या पातळीवर स्थिर आहे. सध्यस्थितीत नोव्हेंबर आणि ऑक्टोबर महिन्याच्या दरांचा विचार करता देशांतर्गत बाजारात मसूरचे दर स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे. ऑक्टोबर महिन्यात मसूरच्या दरात वाढ नोंदवली गेली होती.

हमीभावात 500 रुपयांची वाढ

यावर्षीच्या रब्बी हंगामासाठी केंद्र सरकारकडून मसूरच्या हमीभावात प्रतिक्विंटलमागे 500 रुपयांची वाढ करण्यात आली असून, तो 6000 रुपये प्रति क्विंटल इतका निर्धारित करण्यात आला आहे. मागील वर्षीच्या रब्बी हंगामासाठी केंद्र सरकारने मसूरला 5500 रुपये प्रति क्विंटल हमीभाव निश्चित केला होता. दरम्यान, मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया या देशांमधून मसूरच्या आयातीत घट नोंदवली गेली आहे. त्याचा देशांतर्गत बाजारावर परिणाम होऊन ऑक्टोबर महिन्यात मसूरच्या दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले होते. आयातीत घट होण्याचे प्रमुख कारण म्हणजे कॅनडा आणि भारत या दोन देशांमधील संबंध मागील काही दिवसांपासून बिघडले आहेत.

error: Content is protected !!