Loan Waiver : ही… तर आणीबाणीची परिस्थिती; संपूर्ण कर्जमाफी द्यावी – सुळे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : “गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पावसाने रौद्ररूप धारण (Loan Waiver) केले आहे. पावसाअभावी खरीप हंगाम वाया गेल्यांनतर आता राज्याच्या अनेक भागांमध्ये उरल्यासुरल्या पिकांसह फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे एकीकडे दुष्काळ तर दुसरीकडे अवकाळीचा फटका यामुळे शेतकरी पुरता हवालदिल (Loan Waiver) झाला आहे. ही शेतकऱ्यांसाठी मोठी आणीबाणीची परिस्थिती आहे. अशा काळात राज्य सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून, त्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी.” अशी मागणी राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

सुप्रिया सुळे यांनी एक्स (पूर्वीच्या ट्विटर) या समाजमाध्यमावर पोस्ट करत सरकारकडे ही (Loan Waiver) मागणी केली आहे. त्यांनी यावेळी राज्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करत त्यांना आपल्या पोस्टमध्ये टॅग केले आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्रात यावर्षी दुष्काळाची स्थिती आहे. तर काही ठिकाणी सध्या सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्य सरकारने केंद्र सरकारकडे आपले पथक पाठवून, परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांसाठी मदतीची आग्रही मागणी करायला हवी. असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

राज्य सरकारचे कर्तव्य (Loan Waiver Demand Supriya Sule)

तर संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात शरद पवार केंद्रीय कृषिमंत्री असताना देशाच्या कोणत्याही भागात अशी परिस्थिती उद्भवली तर तेथे केंद्र सरकारचे पथक जाऊन पाहणी करीत असे. आणि त्यानंतर तेथील शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका घेतली जात असे. आता देखील राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देऊन त्यांचा सातबारा कोरा करायला हवा. यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची देखील पाहणी करण्याची मागणी करावी. तसेच शेतकऱ्यांना दिलासा देऊन त्याला पुन्हा उभे करण्याच्या दृष्टीने जे काही करता येईल ते करायला हवे. राज्य सरकारने शेतकऱ्यांप्रती आपले कर्तव्य पार पाडण्याची ही वेळ आहे. असेही त्यांनी आपल्या पोस्ट म्हटले आहे.

दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील काही जिल्ह्यांना अवकाळी पावसाने झोडपले आहे. नाशिक, नगर, नंदुरबार, वाशीम, नांदेड, हिंगोली, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यासह, सात-बारा कोरा करून संपूर्ण कर्जमाफीची मागणी केली आहे.

error: Content is protected !!