मंदिरे आणि धार्मिक कार्यक्रम बंद असल्यामुळे फुलशेतीला मोठा फटका; शेतकरी हतबल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी । मंदिरे आणि धार्मिक क्षेत्र बंद असल्याने फुलांना मागणी नसल्याने अनेक शेतकऱ्यांच्या फुलशेती शेतातच सुकून घेल्या आहेत. एकीकडे कोरोनामुळे प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी असलेली सामसूम हि शेतकऱ्यालाही थंड करत आहे सोबतच, दुसरीकडे लग्नसमारंभ तसेच इतर कार्यक्रमांची थांबलेली परिस्थिती फूलउत्पादक शेतकऱ्यांसाठी आर्थिक खाईत लोटणारी ठरत आहेत. मागणीअभावी फुलबाजार पूर्णपणे कोमेजून गेला आहे. नानाविध प्रकारच्या फुलांनी मळे सजले असले तरी या फुलांमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत. फुले भाव नसल्याने मातीआड लोटावे लागते आहेत. यामुळे शेतकरी पुन्हा एकदा हतबल आणि संकटामध्ये सापडला आहे.

गेल्या काही महिन्यापूर्वी कोरोना संकट कमी झाल्यानंतर मंदिरे आणि धार्मिक कार्यक्रम पुन्हा सुरू झाले. त्यामुळे फुलोत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांसह विक्रेत्यांमध्येही समाधानाचे वातावरण होते. परंतु, वाढलेल्या कोरोना प्रादुर्भावामुळे मंदिरे बंद केली आणि धार्मिक कार्यक्रमांवर बंदी आली असल्यामुले आता फुलांना ग्राहकच उरला नाही. त्यामुळे मागणीच नसल्याने भावातही मोठी घसरण झाली आहे. यामुळे विक्रेते आणि शेतकरी दोघेही आर्थिक संकटात सापडले आहेत.

महाराष्ट्रात अनेक धार्मिक स्थळे आहेत त्यामुळे स्थानिक आणि बाहेरील शेतकरी फुलांची शेती करून फुले मंदिरत घेऊन येतात. एकीकडे तीव्र उन्हातही पिकवलेली फुलशेती, तर दुसरीकडे भाव मिळत नसल्याने विमनस्क अवस्थेत शेतकरी आहेत. देवाच्या दारात भाविक फुलांची खरेदी करतात आणि देवाच्या चरणावर वाहतात. काही पर्यटक गजरे घेतात. गुलाबाचीही मोठी विक्री होते. परंतु कोरोनामुळे धार्मिक स्थळे, मंदिरे आणि देवस्थाने बंद आहेत. त्यामुळे पर्यटक, भाविक येत नाहीत. त्याचा परिणाम दुकानदारांसह शेतकऱ्यांवरही झाला आहे. यामुळे फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्याच्या आयुष्यात कधी सुगंध येईल असा प्रश्न शेतकरी विचारतो आहे.

 

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा

Leave a Comment

error: Content is protected !!