हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात मागील वर्षी जनावरांना लम्पी आजार झाल्याने दुग्ध व्यवसायात मोठा बदल जाणवू लागला आहे. राज्यात पुन्हा एकदा लम्पी स्किनच्या आजाराने डोकं वर काढलं आहे. राज्यातील गोंदिया जिल्ह्यातील चिखली येथील ३ जनावरे दगावली आहेत. यामुळे येथील शेतकरी चिंतेत आहेत आणि पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे. हा आजार रोखण्यासाठी लसीकरण करण्यात आले होते.
लम्पीचा धोका वाढत असताना पशुपालक चिंतेत पहायला मिळत आहेत. लम्पी आजाराचा धोका टाळण्यासाठी लसीकरणावर भर देणं गरजेचं आहे. दरम्यान, शेती व्यवसायात दुय्यम आर्थिक स्त्रोत हा दुग्धव्यवसाय आहे. मात्र यामुळे आता दुग्ध युद्योजक आणि पशुपालक चिंतेत आहेत. विशेष म्हणजे चिखली आणि परिसरातील नवेगाव राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन वन क्षेत्रालगत बफर क्षेत्रात पाळीव जनावरांबरोबरच वन्य जिवांनाही लम्पी आजाराची लागण होऊ नये म्हणून लसीकरणाची गरज भासत आहे.
काही जनावरे बाधित असल्याने त्या जनावरांची काळजी घ्यावी. त्यांना वेगळ्या परिसरात चाऱ्याची, पाण्याची व्यवस्था करून ठेवावी. जेणेकरून यामुळे इतर जनावरांना लम्पीचा संसर्ग होऊ नये. तसे असेल तर पशुसंवर्धनाला तात्काळ माहिती द्यावी. जनावरांवर पशूवैद्यकीय उपचार करावेत. जेणेकरून जनावरांना धोका निर्माण होणार नाही.
लम्पीवर त्वरित उपचार केल्यास जनावरांना उपचार नाहीत :
लम्पी हा आजार संसर्गजन्य असला तरीही त्याची काळजी घेतल्यास हा आजार लवकरात लवकर बरा होतो. या रोगाने पशुधन होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळं घाबरुन जाऊ नये, तसेच मदतीसाठी पशुसंवर्धन विभागाचा टोल फ्री क्र. १८००-२३३०-४१८ अथवा राज्यस्तरीय कॉल सेंटरमधील पशुसेवेचा टोल फ्री क्र. १९६२ तत्काळ संपर्क साधावा.