Lumpy Disease : शेतकऱ्यांनो सावधान! लंम्पिचा धोका पुन्हा वाढतोय, ‘या’ जिल्ह्यात घातला हाहाकार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Lumpy Disease : मागच्या काही दिवसापासून लंम्पिचा धोका आता पुन्हा वाढत आहे. त्यामुळे पशुपालकांनी आपल्या पशूंची योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात तर लंम्पिने हाहाकार घातला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड, राधानगरी, कागल, करवीर, गारगोटी या तालुक्यात लंम्पि सारख्या रोगांनी धुमाकूळ घातला आहे. मागच्या सहा महिन्यात भुदरगड तालुक्यातील 350 पेक्षा जास्त जनावरांना लंम्पिमुळे प्राण गमावा लागला आहे.

त्याचबरोबर राधानगरी तालुक्यातील राशिवडे गावात मागच्या आठ दिवसापूर्वी जवळपास 11 जनावर दगावली होती. सध्या भुदरगड तालुक्यातील तब्बल 30 ते 35 गावांमधील लंम्पिचा प्रादुर्भाव झाला आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. जनावर अचानक दगावल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट निर्माण झाले आहे. (Lumpy Disease )

शासनाकडून पुरेशी मदत मिळत नाही

जिल्हा आरोग्य विभाग आणि गोकुळ दूध संघाच्या अधिकाऱ्यांवर ग्रामस्थांनी याबाबत उपाययोजना न केल्याचा आरोप केला आहे. लंम्पि झालेल्या गुरांवर उपचार करून देखील फारसा फरक पडत नाही मात्र शासनाकडून पुरेशी मदत मिळत नसल्याची तक्रार देखील शेतकऱ्यांनी केली आहे. त्यामुळे सरकारच्या कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

जनावरांना पशुवैद्यकीय सेवा देणारी शासकीय यंत्रणात तोडकी पडत आहे. तालुक्यामधील अनेक दवाखाने असे आहेत की ज्यामध्ये पशुवैद्यकीय डॉक्टर नाही त्यामुळे तालुक्यातील अनेक दवाखाने ओस पडले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना खाजगी सेवेचा आधार घ्यावा लागत असून त्यांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याचे दिसत आहे.

error: Content is protected !!