Lumpy Disease Maharashtra : राज्यात लम्पीचा हाहाकार! मृत पशुधनांची धक्कादायक आकडेवारी समोर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Lumpy Disease Maharashtra : राज्यात मागच्या काही दिवसापासून लम्पी आजाराने थैमान घातले आहे. पशुपालकांच्या डोळ्यादेखत दुभत्या जनावरांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे पशुपालक शेतकरी सध्या चिंतेत आहेत. दरम्यान लम्पी रोगामुळे मृत्यू झालेल्या जनावरांची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. मागच्या पाच महिन्यांमध्ये जवळपास साडेचार हजार जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे लम्पी रोगामुळे सर्वात जास्त मृत्यू हे कोल्हापूर आणि मराठवाड्यामधील जनावरांचे झाले आहेत.

सध्या लम्पीचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे त्यामुळे पशुसंवर्धन विभागाकडून जनावरांची काळजी घेण्याचे आवाहन देखील केले जात आहे. कोल्हापूर अहमदनगर, पुणे, जळगावसह काही जिल्ह्यामधील बाजार देखील बंद करण्यात आले आहेत. १ एप्रिल ते १ सप्टेंबर दरम्यान जवळपास 52 हजार 149 जनावरे लम्पीने संक्रमित झाली तर 4406 गाई आणि बैलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

लम्पीचा वाढता प्रादुर्भाव सध्या पशुपालकांसमोर चिंतेचा विषय बनत चाललेला आहे. आपल्याकडे परराज्यांमधून मोठ्या प्रमाणात जनावरे आणली जातात त्यामुळे जास्त प्रमाणात लम्पीचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे पशुपालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे यावर उपाययोजना कराव्या अशी देखील मागणी आता जोर धरू लागली आहे.

जिल्हानिहाय जनावरांचा मृत्यू

कोल्हापूर- ६९०, अहमदनगर- १८५, सोलापूर- ५५१, परभणी- ५२२, बीड -३७७, लातूर -३६२, रायगड- ०१, अकोला -०२, बुलढाणा -०१.छ. संभाजीनगर- ७३, धाराशीव ७९, चंद्रपूर- ५४, जालना -५१, पुणे -५१, नाशिक- ४२, वर्धा- २७, धुळे- ०५, अमरावती- ०३, हिंगोली- १४०, जळगाव- १४४, सांगली- २७७, नागपूर- ७९, भंडारा ०२,रत्नागिरी- २४, सातारा- १६, वाशिम- १३, नंदुरबार- १०,सिधुदुर्ग- ८०, नांदेड- ५५७,

सरकारकडून मिळणार मदत

मागच्या वर्षी लम्पीने थैमान घातले यावेळी सरकारने पशुपालकांना मदत जाहीर केली होती. त्यानंतर लम्पी कमी झाल्यानंतर ही मदत बंद करण्यात आली होती. मात्र आता पुन्हा एकदा लम्पीचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे ही मदत सुरू करण्यात आली आहे. यामुळे राज्य सरकारकडून लम्पीने दगावलेल्या जनावरांना ३० हजार रुपये गाय तर बैल २५ हजार रुपये मिळणार आहेत त्याचबरोबर वासरासाठी १६ हजार रुपये असे आर्थिक सहाय्य पशुपालकांना देण्यात येणार आहे.

पशुवैद्यकीय डॉक्टरांचा नंबर कसा मिळवाल?

बऱ्याचदा आपण एकाच पशुवैद्यकीय डॉक्टरवर अवलंबून राहतो मात्र कधी कधी काही कारणास्तव तो डॉक्टर आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही अशावेळी आपल्याला दुसऱ्या डॉक्टरची गरज लागते. मात्र यावेळी आपल्याकडे नंबर उपलब्ध नसल्याने आपल्याला मोठा त्रास सहन करावा लागतो. मात्र आता तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. आम्ही खास तुमच्यासाठी Hello Krushi नावाचं एक ॲप बनवला आहे. या ॲपच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या जवळच्या पशुवैद्यकीय डॉक्टरचा नंबर मिळू शकतात.

error: Content is protected !!