Lumpy Skin Update : कोल्हापूर नंतर ‘या’ जिल्ह्यांमध्ये लम्पीने घातला कहर; पशुपालकांसमोर मोठे संकट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Lumpy Skin Update मागच्या काही दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यात लम्पीने अक्षरशः थैमान घातले आहे. यामुळे पशुपालक उत्पादक शेतकरी चांगले चिंतेत आहेत. एकीकडे पावसाळ्यामध्ये पशूंना अनेक आजार होतात तर दुसरीकडे लम्पीने थैमान घातले आहे. यामुळे आता पशुपालक शेतकरी चांगलेच चिंतेत आहेत आहेत. कोल्हापूर नंतर आता छत्रपती संभाजी नगर मध्ये देखील लम्पीने हाहाकार घातला आहे.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड आणि जालना या चार जिल्ह्यांतील लम्पी बाधित जनावरांची संख्या 517 वर पोहोचली आहे यामध्ये 297 इतकी संख्या छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात सर्वाधिक जास्त लम्पीग्रस्त जनावरे आहेत. तर परभणी जिल्ह्यात 144, बीडमध्ये 18 आणि जालन्यामध्ये 58 लम्पी बाधित जनावरे आहेत यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभा राहिले आहे. काही शेतकऱ्यांच्या तर गोठ्यातील सर्वच जनावरांना लम्पीची लागण झाली आहे. यामुळे या शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभा राहिले आहे.

शेतकऱ्यांची सरकारकडे मदतीची मागणी

लम्पीमुळे शेतकऱ्यांची दुभती जनावरे मरू लागली आहेत. यामुळे शेतकऱ्यांवर मोठ संकट निर्माण झाले आहे. सरकारने आता दगावलेल्या जनावरांच्या पशुपालकांना लवकरात लवकर मदत जाहीर करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

दरम्यान, कोल्हापूर मधील राधानगरी, भुदरगड, कागल आणि गारगोटी तालुक्यात तर लम्पीने थैमान घातले आहे. त्यामुळे त्या ठिकाणच्या पशुपालकांची चिंता तर अधिकच वाढले आहे. लम्पीच्या आजारामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत जनावरांचा मृत्यू होत आहे. यामुळे पशुपालकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.

लम्पी रोगावर घरगुती उपाय आणि उपचार

  • लम्पी रोगाने बाधित जनावरांना वेगळे करा
  • माश्या, डास, उवा इ. मारणे.
  • प्राण्याचा मृत्यू झाल्यावर शव उघड्यावर ठेवू नये.
  • संपूर्ण परिसरामध्ये जंतुनाशक फवारणी करा.
  • या विषाणूच्या हल्ल्यामुळे बहुतेक प्राणी मरतात.
  • ज्या गाईला संसर्ग होईल त्या गाईस इतर जनावरांपासून दूर ठेवा.
error: Content is protected !!