Madhuca Longifolia : यंदा मोहफुलाचे उत्पादन घटले; आदिवासी शेतकऱ्यांचा रोजगार हिरावला!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात एकदा मार्च महिना चालू झाला की नाशिक आणि आसपासच्या परिसरात मोहफूल (Madhuca Longifolia) वेचणीचा हंगाम सुरू होतो. साधारणपणे नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर हे तालुके आणि नंदुरबारचा काही भाग तसेच अहमदनगर काही भागात ही मोहफूल वेचणी केली जाते. या पट्ट्यात सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात दरवर्षी मोठ्या मोहफुले बहरली असतात. ज्यामुळे ऐन उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शेतकऱ्यांना या फुलवेचणीतुन मोठी कमाई मिळते. मात्र यावर्षी या भागातील मोहफूल वेचणीला मोठा फटका बसला आहे. प्रामुख्याने वातावरणीय बदलाचा तसेच कमी पावसाचा फटका बसल्याने, मोहफुलांचे (Madhuca Longifolia) उत्पादन देखील घटले आहे.

काय असते मोहफूल? (Madhuca Longifolia Production)

मोहफुल माहित नाही असा एकही माणूस सापडणार नाही. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पानगळती झाल्यानंतर मोहाच्या झाडाला मोहफुले येतात. ही मोहफुले अगदी वासानेही मन बहरून टाकतात. डोंगर दऱ्यात आदिवासी वनपट्ट्यात ही झाडे हमखास आढळून येतात. त्यामुळे गेल्या काही वर्षात मद्यच नाही तर आदिवासी भागातील नागरिकांनी या मोहफुलाचा चांगला उपयोग करण्यास सुरुवात केली आहे.

मोहफुल उत्पादन घटले

मात्र, यंदा मोह फुलांच्या उत्पन्नात कमालीची घट झाली असून, या फुलामध्ये मोठ्या प्रमाणात घट दिसून येत आहे. त्यामुळे या भागातील आदिवासी शेतकऱ्यांच्या रोजगार आणि उदर्निवाहावर परिणाम झाल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे. दरवर्षी आपल्याला सात ते आठ झाडांपासून एक ते दीड पोते मोहफुलाचे उत्पादन मिळायचे, आता त्या ठिकाणी एक टोकरीभरही फुले मिळत नसल्याचे आदिवासी शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे. ज्यामुळे यंदा मोहफुलाच्या उत्पादनात मोठी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच ऐन हंगामात प्रामुख्याने सोमवारी (ता.15) झालेल्या पावसामुळे या फुलांचे मोठे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.

बनवले जातात अनेक पदार्थ

आदिवासी ग्रामीण भागात या झाडाच्या मोह फुलाचा पूर्वापारपासून उपयोग केला जातो. सकाळी उठल्याबरोबर आदिवासी बांधव ही फुले वेचण्यासाठी जात असतात. त्यानंतर ती काही दिवसांकरिता सुकवून बाजारात नेली जातात. हल्ली घरीच मोह फुलापासून चटणी, लाडूसह इतर पदार्थ तयार केले जातात. या पदार्थाना बाजारात चांगली मोठी मागणी असते. त्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांसाठी उन्हाळ्याच्या दिवसात हे उत्पनाचे एक मोठे साधन असते. मात्र, यावर्षी उत्पादनात घट झाल्याने, या शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

error: Content is protected !!