MAFSU Convocation : शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी हातभार लावा; राज्यपालांचे पदवीधरांना आवाहन!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : “देशातील शेती क्षेत्रामध्ये इंद्रधनुष्यातील (MAFSU Convocation) सप्तरंगांप्रमाणे क्रांती घडून येत आहे.अन्नधान्याच्या उत्पादनात हरित क्रांती, दुग्ध उत्पादनात श्वेत क्रांती, कडधान्याच्या उत्पादनात पित क्रांती, मत्स्य उत्पादनात नील क्रांती तर मांस उत्पादनात लाल क्रांती झाली आहे. परिणामी, देशात पशुपालन, मत्स्य शेती व दुग्धव्यवसाय क्षेत्रामध्ये आगामी काळात शेतकऱ्यांना गुंतवणुकीसाठी मोठ्या संधी आहेत. तसेच या क्षेत्रात मोठ्या रोजगार संधी देखील उपलब्ध होणार आहेत.” असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले आहे. ते नागपूर येथील महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापिठाच्या (माफसू) ११ व्या पदवीदान समारंभात (MAFSU Convocation) बोलत होते.

ग्रामीण अर्थव्यवस्थेला हातभार लावावा (MAFSU Convocation In Nagpur)

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यामध्ये पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यपालन व्यवसायामध्ये मोठे सामर्थ्य आहे. त्यामुळे महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापिठातुन पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या तरुणांनी या क्षेत्रात व्यवसाय सुरु करावेत, असे आवाहनही राज्यपाल बैस यांनी उपस्थित पदवीधरांना केले आहे. याशिवाय विद्यापीठातून आज पदवी घेऊन बाहेर तरुणांमध्ये ग्रामीण अर्थव्यवस्थेला हातभार लावून, त्या ठिकाणी रोजगार निर्मिती करण्याची मोठी क्षमता असलयाचे देखील त्यांनी म्हटले आहे.

संघर्ष टाळण्यासाठी प्रयत्न आवश्यक

काही दिवसांपूर्वी आपण विद्यापीठाच्या गोरेवाडा, नागपूर येथील वन्यजीव बचाव व प्रशिक्षण केंद्राला भेट दिली होती. मात्र, सध्याच्या परिस्थितीत वन्यजीव आणि मानवी संघर्ष पाहता या क्षेत्रामध्ये खूप काम करण्याची गरज आहे. त्यामुळे मानव आणि वन्यप्राणी संघर्ष कमी करण्यासाठी अधिकचे प्रयत्न करण्यात यावेत. असे देखील तत्यांनी यावेळी म्हटले आहे.

विद्यापीठाच्या कार्याबाबत कौतुक

विद्यापीठाच्या या पदवीदान समारंभात १७९० विद्यार्थी-विद्यार्थींनिंना पदवी, ९५ जणांना सुवर्ण व रौप्य पदके तर तीन विद्यार्थ्यांना रोख बक्षिसे देण्यात आली. तसेच यावेळी विद्यापीठातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी २०२२ मध्ये ‘लम्पी’ या जनावरांना आजाराबाबत योग्य कार्य केले. तसेच या कालावधीत विद्यार्थ्यांनी स्वदेशी गायींच्या संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले. याबद्दल राज्यपाल रमेश बैस यांनी विद्यापीठाचे कौतुक केले आहे.

error: Content is protected !!