Maha Agro Mart App: कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे तर्फे कृषी विभागाच्या महाऍग्रो ॲपचे अनावरण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यात उत्पादित होणारी कृषी उत्पादने आणि शेतमालाला (Maha Agro Mart App) आता डिजिटल ई कॉमर्सचे व्यासपीठ मिळाले आहे. राज्याच्या कृषी विभागाच्या महा ऍग्रो ॲपचे (Maha Agro Mart App) अनावरण आज कृषिमंत्री धनंजय मुंडे (Agriculture Minister Dhananjay Munde) यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच या ॲपद्वारे खरेदी केलेल्या वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी महाराष्ट्र शासन व भारतीय पोस्ट यांच्या दरम्यान सामंजस्य करारावर स्वाक्षरी देखील करण्यात आली.

कृषी क्षेत्राला आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फायदा होणार (Maha Agro Mart App)

देशात मोबाईल इंटरनेट आणि इलेक्ट्रॉनिक पेमेंट क्रांती झालेली आहे. त्याचा सर्वाधिक फायदा ई-कॉमर्स क्षेत्राला झाला असल्याचे मत कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले. भविष्यात भारतातील ई-कॉमर्स 250 अब्ज डॉलरपर्यंत जाण्याची शक्यता आहे. याचा फायदा कृषी क्षेत्राला व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळावा यासाठी शासनाचे असे इलेक्ट्रॉनिक कॉमर्स मोबाईल ॲप आणि वेब प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन देण्याचा माझा सुरुवातीपासूनच प्रयत्न होता असे ते म्हणाले. सर्वात कमी वयाचा कृषिमंत्री म्हणून पारंपरिक शेती आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न या अॅपद्वारे केला आहे. या ॲपचा महाराष्ट्रातील शेतकरी, बचत गट, स्वयं सहाय्यता गट, स्टार्टअप, लहान मोठे व्यावसायिक व शेतकरी उत्पादक कंपन्यांची शेती उत्पादने, प्रक्रिया केलेली उत्पादने व शेतीशी निगडीत उत्पादनांची ऑनलाईन विक्री होणार असल्याने एका नव्या पर्वाची सुरुवात झाली असल्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे म्हणाले.

या ॲपद्वारे (Maha Agro Mart App) ग्राहकांनी खरेदी केलेल्या वस्तू त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम भारतीय पोस्ट खाते व फर्स्ट अँड फास्ट लॉजिस्टिक करणार असल्यामुळे पोस्ट खात्यावरील विश्वास द्विगुणीत होईल असेही एवढी कृषी मंत्री धनंजय मुंडे म्हणाले. यावेळी अपर मुख्य सचिव श्री अनुप कुमार महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले महाव्यवस्थापक सुजित पाटील सुनील पाटील पोस्टमास्टर जनरल बिझनेस डेव्हलपमेंट अमिताभ सिंग, पोस्टमास्टर जनरल के सोमसुंदरम, मुंबई पोस्ट विभागाचे अजिंक्य काळे, श्रीमती श्रद्धा गोकर्ण तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

बहुपयोगी ॲप (Maha Agro Mart App)

अॅप अनावरणाच्या दिवशीच 358 उत्पादकांची 1370 उत्पादने या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्याबरोबर या ॲपवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हवामान खात्याची माहिती उपलब्ध होणार आहे. तसेच महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळ मार्फत विविध प्रकारच्या कृषी मालाचे दैनंदिन भाव सुद्धा भविष्यात या पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.प्ले स्टोअर मध्ये हे ॲप Maha Agro Mart या नावाने उपलब्ध आहे (Maha Agro Mart App)

error: Content is protected !!