Mahamesh Yojana: राजे यशवंतराव होळकर महामेश योजना; जाणून घ्या सविस्तर माहिती!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: महाराष्ट्रात ग्रामीण भागात (Mahamesh Yojana) अनेक शेतकरी शेती सोबतच शेळी-मेंढी पालनही (Sheep Farming) करत आहेत, परंतु अलीकडच्या काळात अनेक कारणांमुळे राज्यात शेळ्या-मेंढ्यांची संख्या कमी होत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे राज्यातील शेळ्या-मेंढ्यांची घट रोखण्यासाठी व मेंढीपालन व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य सरकारकडून विविध उपाय योजना केल्या जातात. त्यापैकी एक म्हणजे राजे यशवंतराव होळकर महामेश योजना (Mahamesh Yojana).

मुंबई आणि मुंबई उपनगरे वगळून राज्यातील उर्वरित 34 जिल्ह्यांमध्ये ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत एकूण 6 घटकांचा समावेश करण्यात आला असून त्यासाठी रू. 45.81 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

काय आहे योजना (Mahamesh Yojana)

  • ही योजना फक्त भटक्या जमाती (भज-क) वर्गातील लाभार्थ्यांना लागू असेल.
  • योजनेंतर्गत महाराष्ट्र शासनाकडून मेंढी पालनासाठी लाभार्थ्यांना 75% अनुदान दिले जाते. तसेच मेंढीच्या चाऱ्यासाठी 50% अनुदान दिले जाते.
  • या योजने अंतर्गत लाभार्थ्यांची निवड करताना महिलांसाठी 30% आणि अपंगांसाठी 3% आरक्षण देण्यात आले आहे.
  • कायमस्वरूपी एका ठिकाणी राहून मेंढीपालन करण्याकरिता पायाभूत सोई – सुविधेसह 20 मेंढ्या + 1 मेंढानर असा मेंढीगट 75% अनुदानावर वाटप करणे (स्थायी)
  • स्थलांतर पद्धतीने मेंढीपालन करण्याकरिता पायाभूत सोई – सुविधेसह 20 मेंढ्या + 1 मेंढानर असा मेंढीगट 75% अनुदानावर वाटप करणे (स्थलांतरीत)
  • ज्यांच्याकडे स्वत:चे 20 किंवा त्यापेक्षा अधिक परंतु, 40 पेक्षा कमी मेंढ्या आहेत, अशा लाभार्थ्यांना सुधारित प्रजातीचा 1 नरमेंढा 75% अनुदानावर वाटप करणे.
  • ज्यांच्याकडे स्वत:चे 40 किंवा त्यापेक्षा अधिक परंतु, 60 पेक्षा कमी मेंढ्या आहेत, अशा लाभार्थ्यांना सुधारित प्रजातीचा 2 नरमेंढे 75% अनुदानावर वाटप करणे.
  • ज्यांच्याकडे स्वत:चे 60 किंवा त्यापेक्षा अधिक परंतु, 80 पेक्षा कमी मेंढ्या आहेत, अशा लाभार्थ्यांना सुधारित प्रजातीचा 3 नरमेंढे 75% अनुदानावर वाटप करणे.
  • ज्यांच्याकडे स्वत:चे 80 किंवा त्यापेक्षा अधिक परंतु, 100 पेक्षा कमी मेंढ्या आहेत, अशा लाभार्थ्यांना सुधारित प्रजातीचा 4 नरमेंढे 75% अनुदानावर वाटप करणे.
  • ज्यांच्याकडे स्वत:चे 100 किंवा त्यापेक्षा अधिक मेंढ्या आहेत, अशा लाभार्थ्यांना सुधारित प्रजातीचे 5 नरमेंढे 75% अनुदानावर वाटप करणे.
  • ज्यांच्याकडे स्वत: च्या 20 मेंढ्या व 1 मेंढानर अशा एकूण 21 मेंढ्या किंवा त्यापेक्षा अधिक परंतु, 40 मेंढ्यापेक्षा कमी अशा मेंढ्यांच्या एका ठिकाणी राहून स्थायी स्वरूपाचे मेंढी पालनासाठी पायाभूत सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 75% अनुदान वाटप (स्थायी)
  • ज्यांच्याकडे स्वत: च्या 20 मेंढ्या व 1 मेंढानर अशा एकूण 21 मेंढ्या किंवा त्यापेक्षा अधिक परंतु, 40 मेंढ्यापेक्षा कमी अशा मेंढ्यांच्या स्थलांतरीत स्वरूपाचे मेंढी पालनासाठी पायाभूत सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 75% अनुदान वाटप (स्थलांतरीत)
  • ज्यांच्याकडे स्वत: च्या 40 मेंढ्या व 2 मेंढानर अशा एकूण 42 मेंढ्या किंवा त्यापेक्षा अधिक अशा मेंढ्यांच्या एका ठिकाणी राहून स्थायी स्वरूपाचे मेंढी पालनासाठी पायाभूत सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 75% अनुदान वाटप (स्थायी)
  • ज्यांच्याकडे स्वत: च्या 40 मेंढ्या व 2 मेंढानर अशा एकूण 42 मेंढ्या किंवा त्यापेक्षा अधिक अशा मेंढ्यांच्या स्थलांतरीत स्वरूपाचे मेंढी पालनासाठी पायाभूत सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 75% अनुदान वाटप (स्थलांतरीत)
  • एका ठिकाणी राहून स्थायी स्वरूपाचे मेंढी पालनासाठी संतुलित खाद्य उपलब्ध करून देण्यासाठी 75% अनुदान वाटप (स्थायी), 1 (100 ग्रॅम प्रति दिन प्रति मेंढी याप्रमाणे माहे एप्रिल ते जुलै या 4 महिन्याच्या कालावधी करिता)
  • भटकंती करणारे स्थलांतरीत स्वरूपाच्या मेंढी पालनासाठी संतुलित खाद्य उपलब्ध करून देण्यासाठी 75% अनुदान वाटप (स्थलांतरीत), (100 ग्रॅम प्रति दिन प्रति मेंढी याप्रमाणे जून ते जुलै या 2 महिन्याच्या कालावधी करिता)

महामेश योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे (Mahamesh Yojana)

  • आधार कार्ड
  • शिधापत्रिका
  • रहिवासी पुरावा
  • मोबाईल नंबर
  • ई – मेल आयडी
  • पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
  • जमिनीची कागदपत्रे
  • जमिनीतील सह-भागीदारांचे ना हरकत प्रमाणपत्र
  • पशुपालन प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र
  • वयाची नोंदणी
  • उत्पन्न प्रमाणपत्र

योजनेंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया (Mahamesh Yojana)

सदर योजनेंतर्गत अर्जदारांनी केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करणे आवश्यक आहे, कोणत्याही परिस्थितीत ऑफलाईन पद्धतीने किंवा इतर कोणत्याही मार्गाने अर्ज करता येणार नाही, यासाठी ऑनलाइन पद्धती www.mahamesh.in या महामंडळाच्या वेबसाईट वरून किंवा Android मोबाइल व्दारे MAHAMESH अॅप वापरून अर्ज (Mahamesh Yojana) करता येणार आहे.

error: Content is protected !!