Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पात शेतीसाठी काय तरतुदी आहेत? वाचा, संपूर्ण यादी!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : आज राज्यातील शिंदे सरकारचा या टर्ममधील शेवटचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget) विधानसभेत सादर करण्यात आला. राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. यात शेती क्षेत्रासाठी नेमक्या कोणत्या योजना आहेत? आणि त्यासाठी सरकारकडून किती खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. याबाबत आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. याशिवाय अर्थसंकल्पात (Maharashtra Budget)शेती क्षेत्रासाठी अन्य काय-काय घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आल्या आहेत. याची माहिती जाणून घेणार आहोत.

शेतीसाठीच्या अर्थसंकल्पातील घोषणा (Maharashtra Budget 2024)

 • राज्यातील शेतकऱ्यांसाठी ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ या नवीन योजनेअंतर्गत (Maharashtra Budget ) 8 लाख 50 हजार कृषी पंप बसवण्यात येणार आहे.
 • ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना – 2’ अंतर्गत 7 हजार मेगाव्हॅट सौर ऊर्जा निर्मितीचे लक्ष्य गाठण्याची सरकारची योजना असेल. ज्यामुळे मुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
 • पीएम कुसूम योजनेअंतर्गत यावर्षी 1 लाख कृषी पंप स्थापनेचे उद्दीष्ट राज्य सरकारकडून ठेवण्यात आले आहे. त्यापैकी 78 हजार 757 पंप कार्यान्वित झाले असल्याचे अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे.
 • परभणी कृषी विद्यापीठाअंतर्गत बीड जिल्ह्यातील मौजे झिरवाडी, तालुका परळी-वैजनाथ येथे सोयाबीन संशोधन आणि प्रक्रिया उपकेंद्र, शासकीय कृषी महाविद्यालय, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय सुरु होणार आहे.
 • जंगली प्राण्यांद्वारे होणाऱ्या शेती पिकांचे नुकसान टाळण्यासाठी डॉ. शामाप्रसाद मुखर्जी ‘जनवन विकास योजने’अंतर्गत शेतकऱ्यांना सौरऊर्जा कुंपणासाठी अनुदान (Maharashtra Budget) मिळणार आहे.
 • राज्यातील 10 हजार हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवडीला प्रोत्साहन देण्यात येईल.
 • पर्यावरण आणि हवामान बदलासाठी 245 कोटी रुपये, वनविभागाला 2 हजार 507 कोटी तर मृदा आणि संवर्धन विभागाला 4 हजार 247 कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे.
 • राष्ट्रीय पशूधन अभियानाअंतर्गत शेळी, मेंढी, वराह, कुक्कुट आणि वैरण विषयक योजनांचा लाभ शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. त्यासाठीच्या एकूण 129 प्रकल्पांचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवण्यास आला आहे. असेही अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत म्हटले आहे.
 • तसेच 2024-25 या वर्षासाठी खर्चासाठी कृषी विभागास 3650 कोटी, पशू संवर्धन, दुग्ध विकास आणि मत्स संवर्धन विभागास 555 कोटी, फलोत्पादन विभागास 708 कोटी रुपये प्रस्तावित.
 • 2024-25 वर्षासाठी मदत-पुनर्वसन विभागास 668 कोटींच्या मदतीचा प्रस्ताव नियोजित
 • खरिप हंगाम 2023 मध्ये राज्यातील 40 तालुक्यांत दुष्काळ, 1245 महसुली मंडळामध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करुन विविध सवलती लागू करण्यात आल्या आहेत.
 • नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या 44 लाख 82 हजार शेतकऱ्यांना 3825 कोटी रुपयांची रक्कम प्रदान करण्यात आली आहे.
 • विविध नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरता जुलै 2022 पासून आतापर्यंत 12769 कोटींची मदत देण्यात आली आहे.
 • नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत 84 लाख 57 हजार शेतकरी कुटुंबांना पहिल्या हप्त्यापोठी 1691 कोटी 47 लाख अनुदान प्रदान करण्यात आले आहे.
 • खरीप हंगाम 2023 मध्ये 1 रुपया पीकविमा योजनेतून 50 लाथ 1 हजार शेतकरी अर्जदारांना 2268 कोटी 43 लाख रुपये विमा रक्कम अदा करण्यात आलेली आहे.
 • नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या 6000 कोटी रुपये किंमतीच्या पहिल्या टप्प्यात मान्यता देण्यात आलेली आहे.
error: Content is protected !!