Maharashtra Dam Storage : जायकवाडी धरणात केवळ 28.34 टक्के पाणीसाठा; वाचा तुमचं धरण किती भरलंय!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षी पावसाळी हंगामात झालेल्या कमी पावसामूळे राज्यातील अनेक धरणे (Maharashtra Dam Storage) पूर्ण क्षमतेने भरलेली नव्हती. ज्यामुळे सध्या हिवाळा संपून उन्हाळाच्या सुरुवातीलाच राज्यातील काही धरणे कोरडीठाक पडली आहेत. तर काही धरणे मायनस पाणीसाठ्यात गेली आहेत. राज्यातील प्रमुख धरण असलेल्या मराठवाड्याची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या जायकवाडी धरणामध्ये सध्या केवळ 28.34 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर दुसरे सर्वात मोठे धरण असलेल्या उजनी धरणाचा (Maharashtra Dam Storage) जिवंत पाणीसाठा संपून ते 15 दिवसांपासून शून्य टक्क्यांहून घसरून मायनस पाणीसाठ्यामध्ये गेले आहे.

राज्यातील प्रमुख धरणांमधील पाणीसाठा (Maharashtra Dam Storage Today)

राज्यातील धरणांची खाली दिलेली कंसातील आकडेवारी मागील वर्षीचा तर कंसाबाहेरील आकडेवारी ही धरणांमधील सध्याचा पाणीसाठा दर्शविते.

औरंगाबाद विभागातील धरणे

  • जायकवाडी 28.34 (52.36)
  • येलदरी 41.55 (0.00)
  • सिद्धेश्वर 83.41 (34.17)
  • नागझरी 29.89 (42.90)
  • लोअर दुधना 12.90 (49.94)

पुणे विभागातील धरणे

  • खडकवासला 56.82 (61.73)
  • टेमघर 10.59 (9.71)
  • मुळशी 61.89 (77.34)
  • कोयना 61.41 (53.74)
  • उजनी 0.00 (100.00)

नाशिक विभागातील धरणे

  • भंडारदरा 46.91 (90.08)
  • गंगापूर 60.49 (66.89)
  • गिरणा 33.24 (38.28)
  • दारणा 42.97 (93.24)
  • चणकापूर 26.35 (82.46)

नागपूर विभागातील धरणे

  • गोसीखुर्द प्रकल्प 51.76 (44.47)
  • कामठी खैरी 49.81 (86.36)
  • तोतलाडोह 63.50 (66.30)
  • लोअर वर्धा 64.95 (56.85)

अमरावती विभागातील धरणे

  • काटेपूर्णा 33.72 (51.05)
  • अप्पर वर्धा 61.35 (53.80)
  • नळगंगा 35.39 (45.96)
  • बेंबळा 39.25 (44.13)

कोकण विभागातील धरणे

  • मध्य वैतरणा 13.20 (16.25)
  • मोडकसागर 52.74 (52.31)
  • तानसा 61.83 (59.78)
  • भातसा 57.61 (53.33)
  • घाटघर 60.70 (52.04)

दरम्यान धरणांच्या वरील आकडेवारीनुसार, मराठवाडा विभागात सर्वात भीषण पाणीटंचाईची परिस्थिती असून, त्या विभागातील सर्व लहान मोठया धरणामध्ये (Maharashtra Dam Storage) एकूण केवळ 25.31 टक्के पाणीसाठा शिल्ल्क आहे. तर नाशिक (49.31 टक्के) आणि पुणे (49.71 टक्के) विभागातील धरणांनी देखील 50 टक्के पेक्षा खाली घसरण नोंदवली आहे. नागपूर, अमरावती आणि कोकण विभागात सध्या अनुक्रमे 57.18 टक्के, 58.52 टक्के आणि 61.01 टक्के इतका पाणीसाठा आहे. राज्यातील सर्वच धरणांमधील सध्याचा पाणीसाठा मागील वर्षीच्या याच कालावधीतील पाणीसाठ्याच्या तुलनेत खूपच कमी आहे.

error: Content is protected !!