Maharashtra Dam Water Level Today : महाराष्ट्रातील कोणत्या धरणात किती पाणीसाठा? पहा जिल्हानिहाय ताजी आकडेवारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Maharashtra Dam Water Level Today : राज्यामध्ये मागच्या काही दिवसापासून पावसाने चांगलेच थैमान घातले आहे. यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून जनजीवन देखील विस्कळीत झाले आहे. अनेक नद्या नाल्यांना पूर आले आहेत. त्याचबरोबर धरण क्षेत्रात देखील पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. दरम्यान धरण क्षेत्रात किती पाऊस झाला? कोणत्या धरणात किती पाणी साठा झाला? याबाबतची ताजी आकडेवारी आम्ही तुम्हला आज या लेखात सांगणार आहोत. Maharashtra dam water level today

विभागानुसार धरण क्षेत्रातील पाणीसाठा किती टक्के आहे?

महाराष्ट्र राज्यात एकूण ६ विभाग आहेत. जसे पुणे विभागात सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि पुणे हे जिल्हे येतात. राज्यात विभागवार धरणांमधील पाणीस्थिती पहिली तर कोणत्या विभागात एकूण क्षमतेच्या किती टक्के पाणीसाठा आहे याची ताजी आकडेवारी आम्ही दिलेली आहे. यानुसार कोकणात जवळपास ८२ टक्के पाणीसाठा पूर्ण झाला आहे तर औरंगाबाद विभागात राज्यातील सर्वात कमी ६२ टक्के पाणीसाठा झाला आहे.

नागपूर – 64.78%
अमरावती – 62.11%
औरंगाबाद – 28.80%
नाशिक – 42.77%
पुणे – 54.36%
कोकण – 77.65%

राज्यातील मोठ्या धरणांतील पाणीसाठी किती?

महाराष्ट्रातील सर्वात मोठी धरणे असलेल्या कोयना आणि उजनी धरणक्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने दोन्ही धरणांत समाधान कारक पाणीसाठी झाला आहे. कोयना धारण ६२ % भरले असून उजनी धरणात ७३ % पाणीसाठा झाला आहे. औरंगाबाद विभाग अन मराठवाड्यासाठी महत्वाचे समजले जाणारे जायकवाडी धरण मात्र २९% भरलेले आहे. जायकवाडीत २९०९ TMC पाणीसाठा झाला आहे.

कोयना धरण (Koyana Dam Water storage) – २९९८० (६२)
भीमा (उजणी) – (Ujadi Dam Water Storage) ३३२० (७३%)
जायकवाडी – (jayakwadi Dam) २९०९ (२९%)
तोडलाडोह – (Todladoh Water Storage) ११६६ (८२%)
पानशेत – ३१० (७८%)
दूधगंगा – ७१९ (६०%)
राधानगरी (Radhanagri Dam) – २३६ (९९%)

नागपूरमधील कामठी खैरी, या धरणामध्ये जवळपास 73.55% पाणीसाठा आहे. तर खिंडसी – 71.83% नंद – 17.64% वडगाव – 69.26% असा पाणीसाठा या धरणांमध्ये आहे. त्याचबरोबर पुण्यातील खडकवासला धरणामध्ये 95.73% पाणीसाठा आहे. तर डिंबे धरणामध्ये 58.38% गोड धरणामध्ये 5.76% पाणीसाठा आणि पिंपळगाव जोगे या धरणामध्ये 9.90% पाणीसाठा आहे. Maharashtra Dam Water Level Today

नाशिक मधील भवाळ धरणामध्ये सर्वात जास्त म्हणजे 99.58% पाणीसाठा आहे. त्याचबरोबर भाम धरणात 73.37% अर्जुन सागर धरणामध्ये 55.69% चणकापूर धरणामध्ये 31.32% पाणीसाठा असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर औरंगाबाद मध्ये आपेगाव एच.एल.बी धरणामध्ये 42.43% पाणीसाठा आहे. तर पैठण (जायकवाडी) धरणामध्ये 29.42% पाणीसाठा आहे

राज्यातील धरणांची स्थिती नेमकी कशी?

राज्यात जरी आत्ता पावसाने थैमान घातले असले तरी मागच्या वर्षीच्या तुलनेत राज्यातील मोठ्या, मध्यम आणि लघु धरणांमध्ये जवळपास 22 टक्के पाणीसाठा कमी आहे. माहितीनुसार, सातारा जिल्ह्यामध्ये पश्चिम भागात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांच्या पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे. कन्हेर धरणाच्या पाणी पातळीत वाढ पाहायला मिळत आहे. सातारा शहराजवळ असणाऱ्या कन्हेर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून हे धरण 57% भरले आहे. त्याचबरोबर ताज्या आकडेवारीनुसार साताऱ्यातील कोयना धरणामध्ये 61.70% पाणीसाठा आहे.

error: Content is protected !!