Maharashtra Dam Water Level Today । महाराष्ट्रातील ‘ही’ मोठी धरणे 100 टक्के भरत आलीयेत, पहा जिल्हानिहाय यादी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Maharashtra Dam Water Level Today : मागच्या काही दिवसापासून राज्यभरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाने सर्वत्र जोरदार हजेरी लावली असून बऱ्याच ठिकाणी अलर्ट जरी केला आहे. मुंबई, पुणे, नागपूर, रत्नागिरी यासह राज्यात अनेक ठिकाणी पावसाने थैमान घातले आहे. सततच्या या पावसाचा मोठा फायदा झाला असून राज्यातील धरणांच्या पाणीसाठ्यातही वाढ झाल्याचे दिसत आहे. राज्यातील अनेक धरणे ओसंडून वाहत असल्याचे दिसून येत आहे. चलातर मग जाणून घेऊयात राज्यातील कोणती धरणे ८० टक्क्यांपेक्षा जास्त भरली आहेत.

तुमच्या गावात पाऊस पडणार का हे चेक करण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा

पहिल्यांदा विभागानुसार धरण क्षेत्रातील पाणीसाठा किती टक्के आहे ते पाहुयात –

नागपूर – ६४.११ %
अमरावती – ६१.४८ %
औरंगाबाद – ३६.०४ %
नाशिक – ५५.६४ %
पुणे – ५९.३९ %
कोकण – ८५.२४ %

महाराष्ट्रातील मोठ्या धरणांत किती पाणीसाठी?

राज्यातील अनेक धरणांत बर्‍यापैकी पाणीसाठी झाला आहे. यामध्ये अनेक मोठी धरणंही 50% हून अधिक भरली आहेत. यामध्ये कोयना धरणाची (Koyna Dam) एकुण क्षमता 2980 Mcum असून कोयनेत सध्या 2014 Mcum म्हणजेच 65% पाणीसाठा झाला आहे. यानंतर सोलापूर जिल्ह्यातील भिमा उजणी धरनातही (Ujani Dam Water Level) 1725 Mcum पाणीसाठा झाला आहे. तसेच जायकवाडी हे मराठवाड्यासाठी एक महत्वाचे धरण समजले जाते. यामध्ये 1409 Mcum पाणीसाठा झाला आहे. तसेच विदर्भातील तोडलाडोह धरणही 82 % भरले असून त्यात 983 Mcum पाणीसाठी झाला आहे. सांगलीतीप वारणा धरण क्षेत्रातही मुसळधार पाऊस झाल्याने वारणा धरण 80% भरले असून धरनात सध्या 824 Mcum पाणीसाठा आहे.

पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली?

पुणे शहराला (Pune City) पाणीपुरवठा होणारे खडकवासला धरण (khadakwasla. Dam) 98 % भरले आहे. खडकवासला धरणात 84 Mcum पाणीसाठा आहे. तसंच पुणे जिल्ह्यातील चास कमान धरण 97 टक्के भरले असून त्यात 236 Mcum पाणीसाठा झाला आहे. यासोबत मुळशी धरणात 670 Mcum पाणीसाठा झाला असून एकुण क्षमतेच्या 84 टक्के पाणीसाठा झाला आहे.

राज्यात मागील वर्षीपेक्षा कमी पाणीसाठा?

ताज्या आकडेवारीनुसार राज्यातील धरणांमध्ये सध्या 23,652 Mcum पाणीसाठा झाला आहे. धरण क्षमतेच्या 59 टक्के पाणीसाठा झाला असून मागील वर्षीपेक्षा यंदा कमी पाणीसाठा असल्याचं चित्र आहे. मागील वर्षी 30 जून पर्यंत राज्यांतील धरणे 75% पाणीसाठा पुर्ण झाला होता. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा 15 % पाणीसाठा कमी आहे.

रोजचे बाजारभाव मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करून App डाउनलोड करा

महाराष्ट्रातील ‘ही’ मोठी धरणे भरली 80 % हून जास्त –

सातारा जिल्हा 
धोम Dhom Dam – 99′ (85%)
तारळी 141” (85%).

सांगली जिल्हा 
वारणा Warna Dam – 824” (80%)

पुणे जिल्हा 
पाणशेत (Panshet dam) – 256′ (82%)
मुळशी धरण (munshi Dam) – 670′ (84%)
ठोकरवाडी – 301′ (82%)
खडकवासला (Khadakwasla Dam)- 84′ (97%)
चासकमान (Chaskaman Dam) – 236′ (97%)
येडगाव – 88′ (93%)
निरा देवघर – 283′ (83%)

कोल्हापूर जिल्हा
राधानगरी (Radhanagari Dam) – 234′

नाशिक जिल्हा
भवली – 44′ (99%)
भाम धरण – 66′ (86%)

अहमदनगर जिल्हा 
भंडारदरा धरण (Bhandardara Dam) – 262 Mcum (83%)

नागपूर जिल्हा
तोडलाडोह धरण (todladoh Dam) – 983 Mcun (82%)

गडचिरोली जिल्हा
दिना धरण – 72 Mcum (100%)

सिंधुदुर्ग जिल्हा
तिलारी धरण – 381 Mcum (82%)

पालघर जिल्हा
धामणी – 94%
खावदास – 100%

काही धरणांमध्ये पाणी पातळी अजूनही कमीच?

राज्याच्या बऱ्याच भागात मागच्या काही दिवसापासून पावसाने थैमान घातले आहे. अनेक धरणे ओसंडून वाहत आहेत. मात्र असं असलं तरीदेखील राज्याच्या काही भागातील धारणांमध्ये पाणी पातळी अजूनही खूप कमी आहे. त्यामुळे पुढील काळात पाणीटंचाई होईल का? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. Maharashtra Dam Water Level Today

सर्वांत कमी पाणीसाठा कोणत्या धरणांमध्ये?

  • पिंपळगाव जोगे धरण (पुणे) – २१.२३%
  • घोड (चिंचणी) धरण (पुणे) – ११.५४%
  • चणकापूर धरण (नाशिक) – ३०%
error: Content is protected !!