Maharashtra Rain : राज्यात आतापर्यंत किती टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या? किती टक्के पाऊस झाला? जाणून सविस्तर घ्या माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Maharashtra Rain : अनेक दिवस दडी मारून बसलेल्या पावसाने मागच्या काही दिवसापासून संपूर्ण राज्याला झोडपून काढले आहे. राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस (heavy rain) होत आहे. त्यामुळे नदी नाल्यांना पूर आले असून जनजीवन विस्कळीत झाले आह. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या शेत पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक दिवस पाऊस रखडला होता त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आलं होतं मात्र आता झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे हे संकट टळल आहे. मात्र नुकसान देखील झाले आहे. शेतकऱ्यांचे पीक नुकतेच उगवले होते तोच त्याला पावसाचा मोठा तडाखा बसल्याने पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्या आहे

राज्यात किती टक्के पाऊस झाला?

माहितीनुसार राज्यांमध्ये आतापर्यंत सरासरीच्या 104% पाऊस झाला आहे. तर 188 तालुक्यात सरासरीच्या शंभर टक्के पेक्षा जास्त 130 तालुक्यात 75 ते 100% आणि 58 तालुक्यात 50 ते 75 टक्के पाऊस झाल्याची माहिती समोर आली आहे. ही माहिती कृषी विभागाने दिली आहे. त्याचबरोबर पेरणीचा विचार केला तर राज्यामध्ये 120 लाख 37 हजार हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच सरासरीच्या 85 टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. माहितीनुसार, राज्यात सर्वाधिक क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. 111 टक्के क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाल्याची माहिती समोर आली आहे. तर, 96 टक्के कापसाची पेरणी झाली आहे. (Maharashtra Rain)

शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर रोजचा हवामान अंदाज चेक करायचा असेल तर आताच प्ले स्टोअर वर जाऊन Hello Krushi हे ॲपइंस्टाल करा यामध्ये तुम्ही तुमच्या गावात कधी पाऊस पडणार? याबाबतची देखील माहिती एकदम अचूक पद्धतीने जाणून घेऊ शकता. त्यामुळे याचा तुम्हाला मोठा फायदा होईल यामुळे लगेचच प्ले स्टोअर वर जा आणि Hello Krushi हे ॲप इंस्टाल करा.

शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा

प्रधानमंत्री पिक विमा योजनेमध्ये यावेळी शेतकऱ्यांचा सहभाग वाढला असल्याचे दिसत आहे. चालू खरीप हंगामामध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे. त्यामुळे जे शेतकरी इच्छुक आहेत अशा शेतकऱ्यांनी 31 जुलै 2023 पर्यंत प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या लाभासाठी अर्ज करावेत असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.

error: Content is protected !!