Mahindra Cultivator : शेतकऱ्यांसाठी महिंद्रा कंपनीचे टिकाऊ फण; वाचा.. कितीये किंमत!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेती करताना शेतकऱ्यांना अनेक प्रकारच्या कृषी उपकरणांचा (Mahindra Cultivator) वापर करावा लागतो. सर्व उपकरणे शेतीमध्ये आपली वेगवेगळी भूमिका पार पाडत असतात. कृषी उपकरणांमुळे शेतकरी अनेक प्रकारची कामे वेळात करत असतात. या सर्व उपकरणांमध्ये शेतकऱ्यांना कल्टीवेटर देखील गरज पडत असते. त्यालाच शेतकरी ट्रॅक्टरचलित फण असेही म्हणतात. त्यामुळे आता तुम्ही देखील एखाद्या कंपनीचे मजबूत फण घेण्याचा विचार करत असाल. तर महिंद्रा या आघाडीच्या कंपनीचा कल्टीवेटर तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरणार आहे. आज आपण महिंद्राच्या कल्टीवेटर (Mahindra Cultivator) बाबत सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

महिंद्रा कल्टीवेटरची विशेषतः? (Mahindra Cultivator For Farmers)

  • महिंद्रा कल्टीवेटरसाठी 35 ते 65 एचपीचा ट्रॅक्टर आवश्यक असतो.
  • हा कल्टीवेटर 9 टाइन टिलर, 11 टाइन टिलर आणि 13 टाइन टिलरमध्ये उपलब्ध आहे.
  • महिंद्राच्या या कल्टीवेटरसह एकूण वजन 65 से 70 उचलले जाऊ शकते.
  • कंपनीने आपल्या या कल्टीवेटरला 265 ते 369 किलोग्रॅम वजनात तयार केले आहे.
  • या कल्टीवेटरची लांबी 2000 एमएम /2451 एमएम /3060 एमएम ठेवण्यात आली आहे.
  • तसेच या कल्टीवेटरची रुंदी 870 एमएम / 850 एमएम/ 790 एमएम इतकी ठेवण्यात आली आहे.
    -कंपनीने आपल्या कल्टीवेटरला 1000 एमएम इतकी उंची दिली आहे.

महिंद्रा कल्टीवेटरची वैशिष्ट्ये

महिंद्रा कल्टीवेटरच्या (Mahindra Cultivator) मदतीने शेतकरी कमी वेळात शेतीतील अधिक काम करू शकतात. ट्रॅक्टरच्या मदतीने या कल्टीवेटर वापर करणे शेतकऱ्यांना अगदी सोपे आहे. शेतकरी आपल्या कडक जमिनीमध्ये देखील या कल्टीवेटरचा वापर करू शकतात. अर्थात पिकांच्या काढणीनंतर शेतकऱ्यांना पिकांचे मागे राहिलेले पिकाचे बूड, खोड, मुळ्या यांना योग्य पद्धतीने जमिनीमध्ये मिश्रीत करता येते. अगदी कडक जमिनीमध्ये हा कल्टीवेटर मशागतीसाठी उत्तम पर्याय असल्याचे महिंद्रा कंपनीचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे या कल्टीवेटरच्या मदतीने शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी अधिकच्या डिझेलची गरज पडत नाही. असा दावाही कंपनीकडून करण्यात आला आहे.

किती आहे किंमत?

महिंद्रा कंपनीने आपल्या या कल्टीवेटरची किंमत 24,500 रुपये इतकी ठेवली आहे. शेतकऱ्यांची गरज लक्षात घेता कंपनीने अगदी माफक दरात कल्टीवेटर उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे आता तुम्हीही कल्टीवेटर घेण्याच्या विचारात असाल तर महिंद्रा कंपनीचा हा कल्टीवेटर तुमच्यासाठी निश्चितच योग्य पर्याय ठरणार आहे.

error: Content is protected !!