Mahindra Mahavator : रोटाव्हेटर घ्यायचाय? ‘हा’ आहे ‘महिंद्राचा महाव्हेटर रोटाव्हेटर’; वाचा.. किंमत?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : आजकाल शेतीमध्ये आधुनिक साधनांचा (Mahindra Mahavator) वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दोन दशकांपूर्वी बैल जोडी आणि नांगर यांच्या साहाय्याने शेती होत होती. मात्र, आज ट्रॅक्टरसह ट्रॅक्टरआधारित अवजारांची संख्या वाढली आहे. प्रत्येक शेतकऱ्याकडे ट्रॅक्टर आढळून येतो. त्यामुळे आता तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल आणि तुम्ही एखादा चांगला रोटाव्हेटर घेण्याचा घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुम्ही महिंद्रा त्या आघाडीच्या ट्रॅक्टर निर्माता कंपनीचा मजबूत आणि टिकाऊ रोटाव्हेटर खरेदी करू शकतात. आज आपण महिंद्रा कंपनीच्या ‘महिंद्रा महाव्हेटर (Mahindra Mahavator) रोटाव्हेटर’बाबत सविस्तर जाणून घेणार आहोत.

‘महिंद्रा रोटाव्हेटर’ची खासियत (Mahindra Mahavator For Farmers)

महिंद्रा कंपनीचा ‘महिंद्रा महाव्हेटर (Mahindra Mahavator) रोटाव्हेटर’ एक हेवी-ड्यूटी रोटरी टिलर/रोटावेटर आहे. जो खूप टिकाऊ आणि अत्यल्प किमतीत उपलब्ध आहे. महिंद्रा कंपनीचा हा रोटाव्हेटर प्रामुख्याने कडक, ओलसर आणि सुकलेल्या सर्वच प्रकारच्या मातीमध्ये प्रभावीपणे काम करतो. हा रोटाव्हेटर शेतातील पिकांचे मागे राहिलेले मुळांचे अवशेष संपूर्णपणे उपटून बारीक करतो. ज्यामुळे ऊस, कापूस, मका यांसारख्या पिकांच्या कापणीनंतर मागे राहिलेले बूड चांगल्या प्रकारे काढून पुढील पिकासाठी निर्मळ वावर तयार होते. महिंद्रा कंपनीने आपल्याला रोटाव्हेटरसाठी 33 ते 52 एचपी क्षमतेचा ट्रॅक्टर वापरण्याची शिफारस केली आहे.

काय आहेत फीचर्स?

  • महिंद्रा कंपनीचा ‘महिंद्रा महाव्हेटर (Mahindra Mahavator) रोटाव्हेटर’ सर्व प्रकारच्या मातीमध्ये वापरला जाऊ शकतो.
  • कंपनीने हा रोटाव्हेटर 36, 42, 48, 54 आणि 60 ब्लेडमध्ये शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिला आहे.
  • साधारणपणे या रोटाव्हेटरसाठी कंपनीने 33 से 52 एचपी क्षमतेचा ट्रॅक्टर वापरण्याची शिफारस केली आहे.
  • कंपनीने आपल्या या रोटाव्हेटरला मल्टि स्पीड टाइप गियरबॉक्स दिला आहे.
  • महिंद्रा कंपनीचा हा रोटाव्हेटर गिअर ड्राइव्ह टाइप ट्रांसमिशनसह उपलब्ध आहे.
  • शेतीमध्ये आधीच्या पिकांची मागे राहिलेली मुळे, अवशेष हा रोटाव्हेटर बारीक तुकडे करून, पुढील पिकांसाठी तात्काळ जमीन तयार करतो.
  • या रोटाव्हेटर शेतकऱ्यांचा जमिनीच्या मशागतीचा वेळ कमी होऊन, पटकन जमीन तयार होऊन पेरणी करता येते.
  • हा रोटाव्हेटर कोणत्याही प्रकारच्या शेतामध्ये, कोणत्याही मोडवर ठेऊन चालवला जाऊ शकतो.
  • महिंद्रा कंपनीचा ‘महिंद्रा महाव्हेटर रोटाव्हेटर’चा बॉक्स शेतात काम करताना गीअर बॉक्सला सुरक्षित ठेवतो.

किती आहे किंमत?

महिंद्रा कंपनीने आपल्या 36, 42, 48, 54 आणि 60 ब्लेडमध्ये उपलब्ध असणाऱ्या रोटाव्हेटरची किंमत 90 हजार ते 1.28 लाख रुपये दरम्यान निर्धारित केली आहे. यामध्ये कंपनीने आपल्या वेगवेगळ्या मॉडेलनुसार, आकारानुसार ही किंमत निर्धारित केली आहे. याशिवाय कंपनीने आपल्या या रोटाव्हेटरला 2 वर्ष वॉरंटी प्रदान केलेली आहे.

error: Content is protected !!