Mahindra Oja Tractors : महिंद्राने लाँच केले हलक्या वजनाचे 7 नवीन ट्रॅक्टर; जाणून घ्या काय आहेत वैशिष्ट्ये अन शेतकऱ्यांसाठी काय उपयोग?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Mahindra Oja Tractors : महिंद्रा कंपनी ही ट्रॅक्टर निर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी आहे. हि कंपनी सतत नवनवीन ट्रॅक्टर लाँच करत असते. महिंद्राने देशातील छोट्या शेतकऱ्यांसाठी एक अप्रतिम ट्रॅक्टर आणला आहे. कंपनीने येत्या काही दिवसांत भारतीय शेतकऱ्यांसाठी परवडणाऱ्या किमतीत ७ छोटे ट्रॅक्टर आणण्याची घोषणा केली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, OJA 2127 ची किंमत 5.64 लाख रुपये आणि OJA 3140 ची किंमत 7.35 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेची राजधानी केपटाऊनमध्ये, महिंद्राने शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन 3 OJA प्लॅटफॉर्म – सब कॉम्पॅक्ट, कॉम्पॅक्ट आणि स्मॉल युटिलिटी प्लॅटफॉर्मवर नवीन ट्रॅक्टरचे अनावरण केले आहे.

सर्वात कमी किंमतीत शेती उपकरणे कुठून विकत घ्यावीत?

शेतकरी मित्रांनो आता नव्या तंत्रज्ञानावर आधारित आधुनिक शेतीउपयोगी अनेक उपकरणे बाजारात आली आहेत. बऱ्याचदा आपल्याला काही गोष्टी मधल्या विक्रेत्यांच्या साखळीमुळे खूप महाग बसतात. मात्र आता गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असणाऱ्या Hello Krushi मोबाईल अँपमुळे स्वस्तात शेती उपकरणे खरेदी करणे शक्य झाले आहे. १ लाखाहून अधिक शेतकरी सध्या या सेवेचा लाभ घेत आहेत. तुम्ही अजूनही हॅलो कृषी अँप डाउनलोड केले नसेल तर आजच गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi इन्स्टॉल करा. इथे शेती उपकरणांसोबत जमीन मोजणी, सातबारा उतारा डाउनलोड करणे, रोजचे बाजारभाव चेक करणे, जमीन खरेदी विक्री अशा अनेक सेवा मोफत दिल्या जातात.

OJA प्लॅटफॉर्मच्या विकासासाठी 1,200 कोटी रुपयांची गुंतवणूक

कंपनीने ट्रॅक्टरसाठी OJA प्लॅटफॉर्मच्या विकासासाठी 1,200 कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचे सांगितले. या प्लॅटफॉर्मवर 20-70 hp क्षमतेची उत्पादने बनवता येतात. नवीन श्रेणीसह कंपनीचे उद्दिष्ट विशेषत: भारत, यूएसए आणि आसियान प्रदेशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्याचे आहे. महिंद्रा अँड महिंद्राचे अध्यक्ष (कृषी उपकरणे) हेमंत सिक्का म्हणाले की, ओजेए ब्रँड कंपनीला बाजारपेठेतील हिस्सा वाढविण्यात आणि नवीन बाजारपेठांमध्ये प्रवेश करण्यास मदत करेल.

18,000 ट्रॅक्टरची निर्यात

त्याचबरोबर पुढे ते म्हणाले, “आम्ही या व्यासपीठाच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यात उपस्थित राहू. यासोबतच 12 नवीन देशांचे दरवाजेही कंपनीसाठी उघडतील. यामुळे जागतिक हलक्या वजनाच्या ट्रॅक्टर उद्योगात 25 टक्के बाजारपेठेचा वाटा उचलण्याचे आमचे लक्ष्य असेल. असे ते म्हणाले आहेत. देशांतर्गत वाहन निर्माता कंपनी महिंद्रा अँड महिंद्राने छोट्या ट्रॅक्टरच्या नवीन श्रेणीचे अनावरण केले आहे कारण पुढील तीन वर्षांत ट्रॅक्टरची निर्यात दुप्पट करण्याची योजना आहे. जगातील सर्वात मोठी ट्रॅक्टर उत्पादक कंपनी असलेल्या महिंद्रा अँड महिंद्राने गेल्या आर्थिक वर्षात सुमारे 18,000 ट्रॅक्टरची निर्यात केली.

“आम्ही आमची निर्यात आकडे तीन वर्षांत दुप्पट करण्याचा विचार करत आहोत. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ओजेए ट्रॅक्टर्सची महत्त्वाची भूमिका असेल. महिंद्रा अँड महिंद्राने मंगळवारी येथील भारतीय बाजारपेठेसाठी सात उत्पादनांसह तीन OJA प्लॅटफॉर्मचे प्रदर्शन केले. असे कंपनीचे अध्यक्ष म्हणाले आहेत. त्याचबरोबर ते पुढे म्हणाले की, कंपनी ओजेए उत्पादनांसह भारत, आसियान आणि यूएस या तीन प्रमुख भौगोलिक क्षेत्रांना लक्ष्य करणार आहे. हे नवीन श्रेणीसह युरोप आणि आफ्रिकेच्या भूगोलाला देखील लक्ष्य करेल.

ओजा तंत्रज्ञान म्हणजे नेमकं काय ?

संस्कृतमधील ओजस या शब्दापासून या तंत्रज्ञानाला ‘ओजा’ हे नाव दिले गेले आहे. या नावाचा अर्थ ऊर्जा असा होतो. शेतकऱ्यांना शेतातील कामे करण्यासाठी याचा चांगला फायदा होत आहे. या तंत्रज्ञानाला जागतिक स्तरावरील प्रगत ट्रॅक्टर असे ही कंपनी संबोधत आहे.

शेतकऱ्यांसाठी फायदेशीर

जर आपण अधिक वजनाच्या ट्रॅक्टरचा वापर करत असेल तर जमिनीवर याचा मोठा परिणाम होतो. त्याचबरोबर एका पिकासाठी किमान ४ ते ५ वेळा ट्रॅक्टर आपल्याला शेतातून फिरवावा लागतो अशावेळी जास्त वजन असलेल्या ट्रॅक्टरने आपल्या जमिनीचे नुकसान होते. त्यामुळे हलक्या व कमी वजनाचे ट्रॅक्टर फायदेशीर ठरू शकतील.

error: Content is protected !!