Mahindra Rotavator : ‘हा’ आहे अत्याधुनिक रोटाव्हेटर; जो होतो मोबाईलने ऑपरेट, वाचा किंमत!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याच्या घडीला शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञान दाखल होत आहे. ट्रॅक्टरसोबतच (Mahindra Rotavator) त्यासाठी लागणारी अवजारे देखील आता अत्याधुनिक होत आहे. विशेष म्हणजे या अत्याधुनिक साधनांमुळे शेतकऱ्यांचे कष्ट कमी झाले आहे. तसेच शेतकऱ्यांना कमी कष्टात अधिक उत्पन्न मिळण्यास देखील मदत झाली आहे. त्यामुळे आता तुम्ही देखील शेतीतील कष्ट कमी करण्यासाठी एखादा नवीन रोटाव्हेटर घेण्याचा विचार करत असाल तर महिंद्राचा तेज-ई झेडएलएक्स प्लस रोटाव्हेटर (Mahindra Rotavator) तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरणार आहे. आज आपण या रोटाव्हेटर बद्दल सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

तेज-ई झेडएलएक्स रोटाव्हेटर बद्दल (Mahindra Rotavator For Farmers)

  • महिंद्राचा तेज-ई झेडएलएक्स प्लस रोटाव्हेटर (Mahindra Rotavator) हा कोणत्याही प्रकारच्या मातीमध्ये प्रभावीपणे काम करतो.
  • कंपनीने आपल्या या रोटाव्हेटरची निर्मिती 36, 42, 48, 54 आणि 60 पात्यांमध्ये केली आहे.
  • या रोटाव्हेटरला ऑपरेट करण्यासाठी 30 ते 60 एचपी पॉवर असलेला ट्रॅक्टर आवश्यक असतो.
  • कंपनीचा हा अत्याधुनिक रोटाव्हेटर मल्टी स्पीड टाइप गियरबॉक्समध्ये येतो.
  • कंपनीने आपल्या या रोटाव्हेटरला गिअर ड्राइव्ह ट्रांसमिशन दिले आहे.
  • महिंद्राचा तेज-ई झेडएलएक्स रोटाव्हेटर हा 1530/1730/1930/2130/2330 एमएम लांबी आणि 1270/1470/1670/1870 एमएम रुंदी आणि 2070 एमएम उंचीमध्ये तयार करण्यात आला आहे.
  • हा रोटाव्हेटर अगोदरच्या पिकांचे सर्व अवशेष नष्ट करतो.
  • कंपनीने आपल्या या तेज-ई झेडएलएक्स रोटाव्हेटरला 327 ते 423 किलोग्रॅम वजनामध्ये तयार केले आहे.
  • तेज-ई जेडएलएक्स प्लस रोटाव्हेटरचा उपयोग हा सर्व प्रकारच्या पिकांसाठी केला जाऊ शकतो.
  • याशिवाय हा रोटाव्हेटर ओली किंवा कडक जमीन असेल तरी व्यवस्थित काम करतो.
  • या रोटाव्हेटरमुळे शेतकऱ्यांना अल्पावधीत पेरणीसाठी जमीन तयार करता येते.

काय आहेत फीचर्स?

महिंद्राचा तेज-ई झेडएलएक्स प्लस हा रोटाव्हेटर (Mahindra Rotavator) भारतातील पहिला मोबाईलच्या माध्यमातून डिजिटली ऑपरेट होणारा रोटाव्हेटर आहे. जो खूप टिकाऊ आणि किफायती असून, तो मोबाईलमध्ये एका अँपद्वारे ऑपरेट करता येतो. ज्यामुळे शेतकऱ्यांना मशागतीच्या वेळी चांगले काम करण्यास मदत होते. याशिवाय मोबाईलद्वारे ऑपरेट करताना हा रोटाव्हेटर ट्रॅक्टर आणि रोटाव्हेटर यांचे चांगले संतुलन साधतो. महिंद्राचा अत्याधुनिक रोटाव्हेटर शेतकऱ्यांना अनेक प्रकारे काम करण्यासाठी उपयुक्त ठरतो. विशेष म्हणजे हा रोटाव्हेटर ओली, कडक, सुखलेल्या सर्व जमिनीमध्ये गुणवत्तापूर्ण काम करतो.

किती आहे किंमत?

महिंद्रा कंपनीने आपल्या या अत्याधुनिक रोटाव्हेटरची किंमत भारतीय शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन निर्धारित केली आहे. कंपनीने 80 हजार ते 1.16 लाख रुपये किमतीमध्ये हा रोटाव्हेटर शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिला आहे. अर्थात मॉडेल आणि पातेनुसार याची किंमत वेगवेगळी ठेवण्यात आली आहे.

error: Content is protected !!