Mahindra Tractor : महिंद्रा ट्रॅक्टर कंपनीने गाठला 40 लाख ट्रॅक्टर विक्रीचा आकडा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात महिंद्रा या आघाडीच्या ट्रॅक्टर (Mahindra Tractor) उत्पादक कंपनीबद्दल माहिती नाही. असा एकही शेतकरी पाहायला मिळणार नाही. महिंद्रा ही ट्रॅक्टर उत्पादक कंपनी 1963 पासून शेतकऱ्यांच्या सेवेत कार्यरत आहेत. कंपनीने नुकतीच आपली गेल्या आर्थिक वर्षातील एकूण ट्रॅक्टर विक्रीची आकडेवारी जाहीर केली असून, त्यात कंपनीने आपल्या स्थापनेपासून मार्च 2024 पर्यंत 40 लाख ट्रॅक्टर विक्री करण्याचा आकडा पार केला असल्याचे म्हटले आहे. याशिवाय कंपनीने अलीकडेच आपली 60 वर्ष पूर्ण केली आहे. त्यामुळे महिंद्रा ट्रॅक्टर (Mahindra Tractor) कंपनीच्या वतीने एक व्हिडिओ प्रसारित करण्यात आला असून, त्याला “40 लाख शेतकरी ग्राहक आणि तितकाच 60 वर्षांचा भरोसेमंद ब्रँड” असे शीर्षक देण्यात आले आहे.

1963 मध्ये पहिला ट्रॅक्टर लॉन्च (Mahindra Tractor Reaches 40 Lakh Tractor Sales)

महिंद्रा ट्रॅक्टर (Mahindra Tractor) कंपनीने 60 वर्षांपूर्वी अमेरिकन कंपनी ‘हार्वेस्टर इंक’सोबत मिळून, 1963 मध्ये आपला पहिला ट्रॅक्टर लॉन्च केला होता. त्यानंतर लॉन्च झाल्याच्या जवळपास 40 वर्षांनंतर कंपनीला आपला पहिला 10 लाख ट्रॅक्टर विक्रीचा टप्पा पूर्ण करता आला होता. तर त्यानंतर 9 वर्षांनी अर्थात 2013 मध्ये कंपनीला आपला एकूण 20 लाखांचा ट्रॅक्टर विक्रीचा आकडा पार करता आलेला होता. पुढील 30 लाखांचा आकडा पार करण्यासाठी कंपनीला 2019 या वर्षाची वाट पाहावी लागली तर आता कंपनीने मार्च 2024 पर्यंत आपला एकूण 40 लाख ट्रॅक्टर विक्रीचा आकडा पार करण्यात यश मिळवले आहे.

‘कंपनीसाठी मैलाचा दगड’

महिंद्रा कंपनीचे कृषी उपकरण विभागाचे अध्यक्ष हेमंत सिक्का यांनी कंपनीने 40 लाख ट्रक्टर विक्रीचा आकडा पार केल्याचे पार्श्वभूमीवर म्हटले आहे की, शेतीला अधिक आधुनिक बनवत आणि देशातील शेतकऱ्यांना अधिक समृद्ध करण्याच्या उद्देशाने कंपनीने आतापर्यंत एकूण 40 लाख ट्रॅक्टरची विक्री केली आहे. याशिवाय कंपनीला नुकतीच 60 वर्ष पूर्ण झाली असल्याने, कंपनीच्या कामगिरीसाठी हा मैलाचा दगड ठरला आहे. त्यामुळे आपण कंपनीच्या प्रगतीत सहभागी सर्व ग्राहक शेतकऱ्यांचे आभार व्यक्त करतो. आपल्या कष्टाने जगाचा उद्धार करणारे शेतकरी कंपनीसाठी नेहमीच प्रेरणास्रोत ठरत आहे. असेही त्यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!