हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील महिंद्रा ही ट्रॅक्टर (Mahindra Tractor) उत्पादक कंपनी आपल्या शक्तीशाली आणि दमदार ट्रॅक्टर्ससाठी शेतकऱ्यांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. कंपनीने आपल्या वेगवेगळ्या रेंजचे ट्रॅक्टर शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देत लोकप्रियता मिळवली आहे. आता तुम्ही देखील एखादा दमदार ट्रॅक्टर घेण्याच्या विचारात असाल. तर महिंद्रा अर्जुन सीरीजमध्ये येणारा ‘महिंद्रा अर्जुन अल्ट्रा-1 555 डीआय’ हा ट्रॅक्टर (Mahindra Tractor) तुमच्या मोठ्या शेतीसाठी अगदी परफेक्ट असणार आहे. हा ट्रॅक्टर तुम्ही शेतीसोबतच व्यावसायिक कामांसाठी देखील वापरू शकतात.
काय आहे विशेषतः? (Mahindra Tractor Mahindra Arjun Ultra-1 555 DI)
महिंद्रा कंपनीने आपल्या अर्जुन सीरीजमध्ये ‘महिंद्रा अर्जुन अल्ट्रा-1 555 डीआय’ हा ट्रॅक्टर (Mahindra Tractor) तयार केलेला आहे. या आपल्या बलाढ्य ट्रॅक्टरला कंपनीने 3054 सीसी क्षमतेसह 4 सिलेंडर इंजिन दिले आहे. जे 50 एचपी पॉवरसह 187 एनएम टॉर्क जनरेट करते. या ट्रॅक्टरला कंपनीने वॉटर कुलिंग सिस्टिम दिलेली आहे. याशिवाय कंपनीने आपल्या या ट्रॅक्टरला ८ ड्राय टाईप ड्युअल एलिमेंट एयर फिल्टर दिलेला आहे. जो इंजिनचे धूळ मातीपासून संरक्षण करतो. हा ट्रॅक्टर 44.9 एचपी इतकी कमीत-कमी पीटीओ पॉवर आणि 2100 आरपीएमची निर्मिती करतो. महिंद्रा कंपनीने आपल्या अर्जुन सीरीजमध्ये तयार केलेल्या ‘महिंद्रा अर्जुन अल्ट्रा-1 555 डीआय’ या ट्रॅक्टरला पुढील बाजूस 30.89 किलो प्रति तास तर मागील बाजूस 13.21 किलो प्रति तास इतका वेग दिलेला आहे. कंपनीने आपल्या या ट्रॅक्टरला 1850 किलो इतके वजन उचलण्याची क्षमता दिलेली आहे. या ट्रॅक्टरचे एकूण वजन 2350 किलोग्रॅम इतके आहे. महिंद्रा कंपनीने आपल्या या ट्रॅक्टरला 3480 एमएम लांबी आणि 1965 एमएम रुंदी आणि 2125 एमएम व्हीलबेसमध्ये तयार केले आहे. याशिवाय या ट्रॅक्टरला कंपनीकडून 445 एमएम इतका ग्राउंड क्लीयरन्स देण्यात आला आहे.
काय आहेत फीचर्स
- मेकॅनिकल/ ड्युअल अक्टिंग पॉवर स्टीयरिंग.
- पुढील बाजूस 8 गिअर आणि मागील बाजूस 2 गिअरसह गिअरबॉक्स देण्यात आला आहे.
- ड्राय टाईप डबल फ्रिक्शन प्लेट सिंगल / ड्युअल क्लच देण्यात आला आहे.
- हा क्लच पार्शिअली सिंक्रोमेश टाइपमध्ये पाहायला मिळतो.
- कंपनीने आपल्या या ट्रॅक्टरला सिंक्रो टेक ब्रेक दिलेला आहे.
- या ट्रॅक्टरला कंपनीकडून 65 लीटर क्षमतेची डिझेल टाकी देण्यात आली आहे.
- हा ट्रॅक्टर 6 स्प्लिन टाइप पावर टेकऑफसह येतो.
- महिंद्रा कंपनीचा हा अर्जुन अल्ट्रा-1 ट्रॅक्टर 2 व्हील ड्राइवसह येतो.
- त्याला पुढील बाजूस 7.5 X 16 आकारात आणि मागील बाजूस 14.9 X 28 /16.9 X 28 आकारात टायर देण्यात आले आहे.
किती आहे किंमत?
महिंद्रा कंपनीने आपल्या अर्जुन सीरीजमधील ‘महिंद्रा अर्जुन अल्ट्रा-1 555 डीआय’ या ट्रॅक्टरची (Mahindra Tractor) किंमत 6.85 लाख ते 8.00 लाख रुपये इतकी निर्धारित केलेली आहे. आरटीओ रजिस्ट्रेशन आणि रोड टॅक्समुळे या ट्रॅक्टरची किंमत वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळी राहू शकते. कंपनीने आपल्या या ‘अर्जुन अल्ट्रा-1 555 डीआय’ या ट्रॅक्टरला 2000 तास पूर्ण किंवा 2 वर्ष यापैकी जे अगोदर पूर्ण होईल. तितक्या क्षमतेत वारंटी प्रदान केलेली आहे.