Mahindra Tractor Sale : मार्च महिन्यात महिंद्रा ट्रॅक्टरची विक्री 26 टक्क्यांनी घटली!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मार्च महिना नुकताच संपला असून, देशातील आघाडीची ट्रॅक्टर निर्माता कंपनी महिंद्राने (Mahindra Tractor Sale) आपली मासिक ट्रॅक्टर विक्रीची आकडेवारी जाहीर केली आहे. देशातील अनेक भागांमध्ये यंदा सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस, झाल्याने मार्च महिन्यातही कंपनीला एकूण ट्रॅक्टर विक्रीत मोठा फटका बसला आहे. कंपनीच्या मार्च महिन्याच्या आकडेवारीनुसार, मार्च २०२४ या महिन्यात कंपनीला एकूण ट्रॅक्टर विक्रीत (Mahindra Tractor Sale) 26 टक्क्यांचा फटका बसला आहे.

केवळ 26,024 ट्रॅक्टरची विक्री (Mahindra Tractor Sale March 2024)

महिंद्रा कंपनीच्या आकडेवारीनुसार, कंपनीने मार्च २०२४ या महिन्यात देशातंर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात एकूण 26,024 ट्रॅक्टरची विक्री (Mahindra Tractor Sale) केली आहे. जी मागील वर्षीच्या मार्च २०२३ या महिन्यात 35,014 ट्रॅक्टर इतकी नोंदवली गेली होती. अर्थात महिंद्रा कंपनीच्या एकूण देशातंर्गत ट्रॅक्टर विक्रीत आणि एकूण निर्यात विक्रीत 26 टक्के घट नोंदवली गेली आहे. परिणामी, यंदाच्या मार्च महिन्यात कंपनीला एकूण विक्रीत विशेष कामगिरी करता आलेली नसल्याचे आकडेवारीतून पाहायला मिळत आहे.

देशातंर्गत विक्रीत 28 टक्क्यांनी घट

महिंद्रा कंपनीला गेल्या मार्च २०२४ या महिन्यात देशातंर्गत बाजारात एकूण 24,276 ट्रॅक्टरची विक्री (Mahindra Tractor Sale) करण्यात यश मिळाले आहे. मागील वर्षीच्या मार्च २०२३ या महिन्यात कंपनीने देशांतर्गत बाजारात एकूण 33,622 ट्रॅक्टरची विक्री केलेली होती. अर्थात यावर्षी कंपनीला देशातंर्गत बाजारात एकूण ट्रॅक्टर विक्रीत 28 टक्क्यांनी घट सहन करावी लागली आहे.

निर्यात विक्रीत 26 टक्क्यांनी घट

याशिवाय गेल्या मार्च २०२४ महिन्यात महिंद्रा कंपनीला आपल्या निर्यात विक्रीत देखील घसरण सहन करावी लागली आहे. कंपनीच्या आकडेवारीनुसार, मार्च २०२४ या महिन्यात केवळ 1,748 ट्रॅक्टर निर्यात करण्यात यश मिळाले आहे. कंपनीने मागील वर्षी मार्च २०२३ या महिन्यात एकूण 1,392 ट्रॅक्टरची निर्यात केली होती. अर्थात महिंद्रा कंपनीला मार्च महिन्यात एकूण निर्यात विक्रीत 26 टक्क्यांनी फटका सहन करावा लागला आहे.

error: Content is protected !!