Mahindra Tractor Sale : महिंद्रा ट्रॅक्टरच्या देशांतर्गत विक्रीत 16 टक्के घट; निर्यात विक्रीत 32 टक्के वाढ!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महिंद्राचे ट्रॅक्टर शेतकऱ्यांमध्ये विशेष प्रसिद्ध आहे. मात्र, कंपनीच्या ट्रॅक्टर विक्रीमध्ये (Mahindra Tractor Sale) गेल्या काही महिन्यांमध्ये सलग मोठी घसरण नोंदवली गेली आहे. नुकतीच कंपनीने आपली फेब्रुवारी 2024 या महिन्यातील आकडेवारी जाहीर केली असून, गेल्या महिन्यात कंपनीच्या एकूण ट्रॅक्टर विक्रीत 16 टक्के घट नोंदवली गेली आहे. यावर्षी देशातील अनेक भागांमध्ये पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहिल्याने सर्वच ट्रॅक्टर निर्माता कंपन्यांना विक्रीत (Mahindra Tractor Sale) घट सहन करावी लागत आहे.

देशांतर्गत विक्रीत मोठी घट (Mahindra Tractor Sale In February 2024)

महिंद्रा कंपनीने फेब्रुवारी 2024 या महिन्यात एकूण 21672 ट्रॅक्टरची विक्री केली आहे. जी मागील वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात 25791 ट्रॅक्टर विक्री (Mahindra Tractor Sale) इतकी नोंदवली गेली होती. अर्थात कंपनीच्या देशांतर्गत आणि निर्यात विक्रीत एकूण 16 टक्के घट नोंदवली गेली आहे. तर गेल्या फेब्रुवारी महिन्यात कंपनीने देशातंर्गत बाजारात एकूण 20121 ट्रॅक्टर विक्री केली आहे. मागील वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात कंपनीने देशांतर्गत बाजारात 24619 ट्रॅक्टर विक्री केले होते. अर्थात महिंद्रा कंपनीच्या देशांतर्गत ट्रॅक्टर विक्रीत 18 टक्के घसरण नोंदवली गेली आहे.

निर्यात विक्रीत 32 टक्के वाढ

याउलट कंपनीने गेल्या फेब्रुवारी महिन्यात निर्यात विक्रीत मोठी झेप घेतली. गेल्या महिन्यात कंपनीला एकूण 1551 ट्रॅक्टर विदेशात निर्यात करण्यात यश मिळाले आहे. मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात कंपनीचे एकूण 1172 ट्रॅक्टर निर्यात झाले होते. अर्थात कंपनीने गेल्या महिन्यात महिंद्रा ट्रॅक्टरच्या निर्यात विक्रीमध्ये 32 टक्के वाढ नोंदवली आहे. त्यामुळे निर्यात व्रिक्रीच्या दृष्टीने गेला फेब्रुवारी महिना कंपनीसाठी फायदेशीर ठरला आहे.

कमजोर मॉन्सूनचा विक्रीस फटका

महिंद्रा कंपनीचे कृषी उपकरण विभागाचे अध्यक्ष हेमंत सिक्का यांनी याबाबत बोलताना म्हटले आहे की, अनियमित आणि कमजोर मॉन्सूनमुळे यावर्षी फेब्रुवारी महिन्यात कंपनीची ट्रॅक्टर विक्रीत पीछेहाट झाली आहे. मात्र सध्या अनेक राज्यांमध्ये रब्बी हंगामातील गहू पीक काढणीला आले आहे. सरकारने काही भागामध्ये सरकारी खरेदी सुरु केली आहे. त्यामुळे आगामी काळात शेतकऱ्यांकडे आर्थिक जमवाजमव जुळून आल्यास, ट्रॅक्टर खरेदीमध्ये कंपनीला वाढ होण्याची अपेक्षा आहे. मात्र असे असेल तरी कंपनीने मागील महिन्यात निर्यात विक्रीत बरीच आघाडी घेतली असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!