Mahindra Tractors : महिंद्राचा 585 युवो टेक प्लस ट्रॅक्टर; पहा काय आहेत वैशिष्ट्ये!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील आघडीची ट्रॅक्टर उत्पादक कंपनी महिंद्राने (Mahindra Tractors) नुकतेच आपले ओजा, नोवो आणि युवो सीरिजचे ट्रॅक्टर मॉडेल एका कार्यक्रमात प्रदर्शित केले आहेत. त्यापैकी कंपनीने प्रदर्शित केलेल्या Mahindra 585 YUVO TECH+ ट्रॅक्टरबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. तसेच (Mahindra Tractors) कंपनीने Mahindra 75WD Tractor रोटाव्हेटर देखील प्रदर्शित केले आहेत. त्याबाबतही माहिती जाणून घेणार आहोत.

महिंद्रा 585 YUVO TECH+ ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये (Mahindra Tractors New Model)

महिंद्रा कंपनीने Mahindra 585 YUVO TECH+ ट्रॅक्टर त्याच्या शक्तिशाली इंजिन आणि प्रगत वैशिष्ट्यांसाठी शेतकऱ्यांमध्ये ओळख निर्माण करण्यासाठी निर्माण केला आहे. त्यांची निर्मिती मजबूत कामगिरीसाठी करण्यात आली आहे. महिंद्रा (Mahindra Tractors) कंपनीच्या या ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला 4 सिलिंडरमध्ये डीआय इंजिन पाहायला मिळणार आहे. याची इंजिन क्षमता 36.75 kW (49.3 HP) इतकी असणार आहे. त्यामुळे आपल्या दणगटपणामुळे हा ट्रॅक्टर शेतकऱ्यांसाठी उत्तम ट्रॅक्टर असणार आहे. हा ट्रॅक्टर त्याच्या प्रभावी ताकदीशिवाय त्याच्या एर्गोनॉमिक बैठक व्यवस्थेसह चालकाला आरामदायी अनुभव प्रदान करणार आहे. या मॉडेलची विशेषतः म्हणजे त्याची विश्वासार्हता, कारण त्याला कंपनीकडून सहा वर्षांची वॉरंटी देण्यात आली आहे. त्यामुळे महिंद्रा 585 YUVO TECH+ ट्रॅक्टर कृषी व्यवसायासाठी एक प्रभावी ट्रॅक्टर मानला जाणार आहे.

महिंद्रा महावतार रोटाव्हेटर

महिंद्रा कंपनीचे महिंद्रा महावतर हे रोटाव्हेटर शेतकऱ्यांसाठी अत्यंत किफायतशीर आहे. देशातील शेतकर्‍यांसाठी हे हेवी-ड्युटी रोटरी टिलर/रोटाव्हेटर आहे. जे अत्यंत टिकाऊ आहे तसेच शेतातील आव्हानात्मक परिस्थितीतही उत्कृष्ट कामगिरी करू शकणार आहे. या रोटाव्हेटरची रचना कंपनीने ओले असो वा कोरडे, अथवा कडक जमिनीतही प्रभावीपणे काम करण्यासाठी डिझाइन केलेली आहे. महिंद्रा ट्रॅक्टर कंपनीच्या मते, हे महाव्हेटर टिलर/रोटाव्हेटर कठीण जमिनीतही ऊस आणि कापूस यांसारख्या पिकांमध्ये उत्कृष्ट कापणी आणि मिक्सिंग क्षमता प्रदान करून कठीण पिकांचे अवशेष प्रभावीपणे हाताळू शकते.

error: Content is protected !!