Mahindra Tractors : डिसेंबरमध्ये महिंद्रा ट्रॅक्टरची विक्री 18 टक्क्यांनी घटली; ‘हे’ आहे कारण!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील आघाडीची ट्रॅक्टर निर्माता कंपनी महिंद्राने (Mahindra Tractors) आपली डिसेंबर 2023 या महिन्यातील एकूण ट्रॅक्टर विक्रीची आकडेवारी जाहीर केली आहे. यावर्षी डिसेंबर महिन्यात देशातंर्गत बाजार आणि निर्यात मिळून एकत्रितपणे 19,138 महिंद्रा ट्रॅक्टर विक्री करण्यात आले आहे. मागील वर्षीच्या डिसेंबर 2022 या महिन्यात 23,243 ट्रॅक्टरची विक्री महिंद्रा कंपनीने केली होती. अर्थात यावर्षी महिंद्रा ट्रॅक्टरच्या (Mahindra Tractors) एकूण विक्रीत 18 टक्क्यांनी घट नोंदवली गेली आहे.

महिंद्रा ट्रॅक्टर कंपनीच्या (Mahindra Tractors) आकडेवारीनुसार, डिसेंबर 2023 या महिन्यात कंपनीने देशातंर्गत बाजारात एकूण 18,028 ट्रॅक्टरची विक्री केली आहे. जी मागील वर्षीच्या डिसेंबर 2022 या महिन्यात 21,640 इतकी नोंदवली गेली होती. अर्थात या डिसेंबर महिन्यात मागील वर्षीच्या तुलनेत महिंद्राच्या देशातंर्गत ट्रॅक्टर विक्रीत 16.69 टक्क्यांनी घट नोंदवली गेली आहे. तसेच महिंद्रा कंपनीने केलेल्या एकूण ट्रॅक्टर निर्यातीतही या डिसेंबर महिन्यात 31 टक्क्यांनी घट नोंदवली गेली आहे. डिसेंबर 2023 या महिन्यात कंपनीने एकूण 1,110 ट्रॅक्टरची निर्यात केली आहे. जी मागील वर्षीच्या डिसेंबर महिन्यात याच कालावधीत 1,603 ट्रॅक्टर इतकी नोंदवली गेली होती. अर्थात यावर्षी कंपनीच्या ट्रॅक्टर निर्यातीत मोठी आपटी पाहायला मिळाली आहे.

वार्षिक विक्रीमध्येही घट (Mahindra Tractors Sales Down 18 Percent In Dec)

महिंद्राच्या ट्रॅक्टरच्या देशातंर्गत वार्षिक विक्रीमध्ये आतापर्यंत 2 टक्क्यांची घट नोंदवली गेली आहे. कंपनीने चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत एप्रिल ते डिसेंबर या कालावधीमध्ये एकूण 2,97,157 ट्रॅक्टरची विक्री केली आहे. मागील वर्षी याच कालावधीत 3,03,664 ट्रॅक्टरची विक्री करण्यात कंपनीला यश मिळाले होते. तर निर्यात विक्रीमध्ये चालू आर्थिक वर्षांमध्ये महिंद्रा कंपनीने मागील वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत 32 टक्क्यांनी आपटी घेतली आहे.

डिसेंबरमधील घट स्वाभाविक

महिंद्रा कंपनीचे कृषी अवजारे विभागाचे अध्यक्ष हेमंत सिक्का यांनी कंपनीच्या डिसेंबर महिन्यातील कामगिरीबाबत बोलताना म्हटले आहे की, डिसेंबर महिन्यात कंपनीने देशातंर्गत बाजारात 18,028 ट्रॅक्टरची विक्री केली आहे. डिसेंबर महिन्यात शेतीमध्ये विशेषतः ट्रॅक्टरचे मशागतीसाठी इतके काम नसते. त्यामुळे या कालावधीत ट्रॅक्टर विक्रीत घट होते. ही घट स्वाभाविक असते, मात्र यापुढील नवीन वर्षातील पहिल्या तीन महिन्यांमध्ये शेतकऱ्यांकडून खरेदी वाढू शकते, अशी कंपनीला आशा आहे असेही त्यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!