Mahogany Tree Farming : चक्क पैशाचे झाड!! 1 एकर जमीन आणि 12 वर्षात करोडपती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । कधी कधी आपण ऐकलं असेल कि काहीजण म्हणतात पैसा काय झाडाला लागलाय होय? हे खरं आहे की, पैसा झाडांवर उगवत नाही. पण जगभरात अशी अनेक झाडे आहेत जी लावून चांगले पैसे कमावता येतात आणि तुमचे उत्पन्न सुद्धा वाढू शकते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका झाडाबद्दल सांगणार आहोत जे एकदा लावलं की, 12 वर्षात तुम्ही कोरोडपती बनून मालामाल व्हाल. चला तर मग जाणून घेऊयात या पैशाच्या झाडाची गोष्ट.

ह्या पैशाच्या झाडाचे नाव आहे महोगनी . हा वृक्ष जभरात अतिशय मौल्यवान वृक्ष म्हणून गणला जातो. ह्या वृक्षाचे लाकूड, पाने, बिया आणि फुले असे प्रत्येक भाग बाजारात चांगल्या दराने विकले जातात. महोगनी वृक्षाचे लाकूड पाण्यात लवकर कुजत नसल्याने त्या लाकडापासून जहाजे बनवण्यात येतात तसेच लाकडी मूर्ती, सजावटीच्या वस्तू आणि वाद्ये बनवण्यासाठीही महोगनीच्या लाकडाचा वापर केला जातो. विविध आजारांवर रामबाण उपाय म्हणून टॉनिक औषध बनवण्यासाठी महोगनीच्या बिया आणि पाने वापरली जातात. कॅन्सर, दमा, रक्तदाब, सर्दी आणि मधुमेह यासह अनेक आजारांवर ह्या झाडाच्या पानांचा वापर केला जातो. त्याची पाने शेतीसाठी कीटकनाशक तयार करण्यासाठी देखील वापरली जातात. महोगनीच्या पानांचे तेल साबण, रंग आणि वार्निश उद्योगात वापरले जाते.

चक्क परदेशातही ह्या वृक्षाला मागणी असून महोगनीच्या झाडाची पाने, बिया आणि लाकूड यांची ब्राझील, कॅनडा आणि अमेरिकेत निर्यात केली जाते . भारतात महोगनीची लागवड डोंगराळ भाग वगळता सर्व मैदानी भागात करता येते. महोगनीच्या झाडावर कीड व रोग शक्यतो आढळून येत नाही त्यामुळे त्यावर कीटकनाशक फवारणीच्या आपल्या खर्चात बचत होते.

महोगनी वृक्षाच्या लागवडीमधून मिळणारे उत्पन्न-

महोगनीचे लाकूड तपकिरी- लालसर रंगाचे असते. हे रोप 12 वर्षात पूर्णतः वाढते. त्याचे एक घनफूट लाकूड 1300 ते 2500 रुपयांना विकले जाते. लाकडाचा रंग आणि गुणवत्तेवर किंमत अवलंबून असते. लाकडाचा रंग लाल असेल तर ते जास्त किमतीला विकले जाते. त्यामानाने तपकिरी रंगाच्या लाकडाची किंमत थोडी कमी आहे.

12 वर्षांत, महोगनी वनस्पती 60 ते 80 फूट उंचीपर्यंत वाढते. तज्ञांच्या मते एका झाडापासून सुमारे 40 घनफूट लाकूड मिळते, सरासरी 1500 रुपये प्रति घनफूट दराने लाकूड विकले तर एक झाड 60 हजार रुपयांना विकले जाते. महोगनी वनस्पती पाच वर्षांतून एकदा बिया देते. एका रोपातून सुमारे 5 किलो बियाणे मिळते. बाजारात बियाण्याची किंमत एक हजार रुपये किलो आहे. अशा प्रकारे 12 वर्षात तुम्ही 10,000 रुपये किमतीचे बियाणे विकू शकता.शिवाय 12 वर्षात एका रोपातून 70,000 रुपयांचे उत्पन्न मिळू शकते. जर एखाद्या शेतकऱ्याने आपल्या शेतात 500 महोगनी रोपे लावली तर 12 वर्षांनंतर तो पूर्ण वाढ झालेले वृक्ष तीन कोटी रुपयांना विकू शकतो. देशातील सर्वात मोठे ऑनलाइन विक्री पोर्टल असलेल्या इंडिया मार्टवर महोगनी लाकडाच्या एका घनफूटची किंमत २५०० रुपये दाखवण्यात आली आहे. तपकिरी रंगाच्या लाकडाची किंमत 1450 रुपये प्रति घनफूट असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

अशी करावी महोगनी झाडाची लागवड-

महोगनीच्या झाडाची मुळे फार खोल नसतात, त्यामुळे हे झाड डोंगराळ किंवा जोरदार वाऱ्याच्या ठिकाणी पडण्याची भीती असते. पाणी साचलेल्या आणि खडकाळ जमिनीत महोगनी रोप लावू नका. लागवड करताना कडक उन्हाळा किंवा अति थंड हवामान टाळावे. शेताची खोल नांगरणी केल्यानंतर शेत समतल करावे. आता त्यात ५ ते ७ फूट अंतरावर ३×२ खड्डा तयार करावा . प्रत्येक खड्यांमधील अंतर हे 4 मीटर असावे. आता हे खड्डे शेणखत व रासायनिक खते जमिनीत मिसळून बुजवन्यात यावे . त्यांना चांगले पाणी द्यावे. काही काळानंतर या खड्ड्यांमध्ये महोगनी रोपे लावावित.

एक एकर जमिनीवर महोगनीची लागवड केल्यास सुमारे 1100 झाडे लावता येतील. महोगनी रोपाची किंमत वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या प्रकारे दर्शविली जाते. इंडिया मार्टमध्ये एका प्लांटची किंमत 25 रुपये ते 85 रुपये आहे. बाजारात 100 ते 150 रुपयांना चांगल्या प्रतीचे रोप मिळेल. अशा प्रकारे एक एकर शेतात महोगनी लागवड केल्यास एक ते दीड लाख रुपये खर्च येतो. विशेष म्हणजे पहिली दोन वर्षे रोपांची काळजी घेणे आवश्यक आहे. यानंतर, कोणत्याही प्रकारची काळजी किंवा पैसा वेगळा खर्च करण्याची गरज नाही.

error: Content is protected !!