Maize Crop : तांदळाला धान्याचा राजा म्हटले जाते; मग धान्याची राणी कोण? वाचा…सविस्तर!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये विविध पिकांची (Maize Crop) वेगवेगळी ओळख आहे. तसेच त्यांना काही विशेष नावांनी देखील ओळखले जाते. यामध्ये आंबा फळाला ‘फळांचा राजा’ म्हणून ओळखले जाते. इतकेच नाही तर भारतात काही शहरांना देखील विशिष्ट नावे आहे. जसे की महाराष्ट्रातील नागपूर शहराला संत्री पिकामुळे ‘ऑरेंज सिटी’, राजस्थानच्या जयपूर शहराला ‘पिंक सिटी’ म्हटले जाते. अगदी त्याच पद्धतीने तांदळाला ‘अन्नधान्याचा राजा’ म्हटले जाते. मग आता जर तांदूळ पीक ‘धान्याचा राजा’ आहे. तर ‘धान्याची राणी’ कोण? असा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो. याच पार्श्वभूमीवर आज आपण ‘धान्याची राणी’ (Maize Crop) कोण? तिची विशेषतः काय आहे. तिचा वापर कुठे होतो? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत.

देशातील तिसऱ्या क्रमांकाचे पीक (Maize Crop Queen Of The Grain)

भारतीय हवामानाचा विचार करता खरीप, रब्बी, उन्हाळी या तीनही हंगामात मका उत्पादन सहज घेणे शक्य होते. विशेष म्हणजे मकामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्त्वे आहेत. इतकेच नाही तर सर्व प्रकारच्या मातीमध्ये मका पीक (Maize Crop) घेतले जाऊ शकते. त्यामुळेच मका या पिकाला ‘अन्नधान्याची राणी’ म्हणून संबोधले जाते. देशात अन्नधान्यांमध्ये सर्वाधिक तांदूळ पिकतो, दुसऱ्या क्रमांकावर गहू तर तिसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक अन्नधान्य उत्पादन मिळणारे पीक म्हणून मका हे पीक आहे.

मकाचे महत्वाचे उपयोग

मकामध्ये मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेड, शुगर, स्निग्ध पदार्थ, प्रथिने, फायबर, जीवनसत्वे आणि खनिजे आढळतात. मकापासून ढोकळा, लहान मुलांचे पॉप कॉर्न असे अनगिणत वस्तू बनवल्या जातात. तसेच पोल्ट्री व्यवसायात खाद्य म्हणून मकाचा वापर केला जातो. तर इथेनॉल निर्मितीमुळे देखील सध्या मकाला मोठे महत्व प्राप्त झाले आहे. मकाच्या नियमित सेवनामुळे शरीराला अनेक फायदे होतात. हाडे बळकट होतात. याशिवाय अनेक आरोग्यविषयक तक्रारीदरम्यान डॉक्टर मकाचा आहारात समावेश करण्याचा सल्ला देतात. याशिवाय देशातील अनेक भागांमध्ये सध्या मका आधारित प्रक्रिया उद्योग उभे राहत आहे. ज्यामुळे अन्नधान्याच्या या राणीमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होत आहे.

मका उत्पादनात भारत सहावा

वातावरणातील या बदलत्या काळात मका पिकाचे महत्व वाढले आहे. त्यामुळे सध्या भारतात शेतकऱ्यांकडून तांदूळ आणि गव्हानंतर सर्वाधिक मका उत्पादन घेतले जाते. उत्पादनाच्या दृष्टीने विचार करता भारताचा अमेरिका, चीन, ब्राजील, अर्जेटीना आणि यूक्रेननंतर मका उत्पादनात सहावा क्रमांक आहे. तर भारतात आंध्र प्रदेश, कर्नाटक, राजस्थान, महाराष्ट्र, बिहार आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये सर्वाधिक मका उत्पादन घेतले जाते.

error: Content is protected !!